शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

१५ पैकी फक्त भुसावळ तालुका हगणदरीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 00:05 IST

शौचालये उभारणीकडे दुर्लक्ष : वाईट स्थिती असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश

जळगाव : हगणदरीमुक्तीबाबत खराब कामगिरी असलेल्या राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश आहे. या आठ जिल्ह्यांमध्येही जळगाव मागेच असून, अजून दोन लाख ४१ हजार व्यक्तिगत लाभाची शौचालये उभारण्याचे मोठे उद्दीष्ट जळगावला पूर्ण करायचे आहे. २०१६-१७ मध्ये जिल्ह्यास ८० हजार शौचालये बांधायची होती. त्यातील फक्त ३८ हजार शौचालये आतापर्यंत उभारण्यात आली. या महिनाअखेरपर्यंत तब्बल ४२ हजार शौचालये जि.प.च्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला उभारायची आहेत. तर २०१७-१८ या वर्षात म्हणजेच पुढील वर्षभरात दोन लाख शौचालये बांधायची आहेत. पण या कामासंबंधी अशीच संथ गती राहिली तर हे उद्दीष्ट कसे पूर्ण होईल, अशी चिंता राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार मीणा यांनी गुरुवारीच आढावा बैठकीमध्ये व्यक्त केली. राज्यात नाशिक, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, नगर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये व्यक्तीगत शौचालये उभारणीसंबंधीचे कामकाज संथ आहे. या जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त भुसावळ तालुका हगणदरीमुक्त झाला आहे. अलीकडेच या तालुक्याचा पालकमंत्र्यांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. पं.स.सभापती राजेंद्र चौधरी यांनी सन्मान स्वीकारला होता.जिल्हा प्रशासनातर्फे हगणदरीबाबत मोहिम राबविण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी सामूहिक शौचालये नाहीत, ज्या ठिकाणी आहेत, तेथे पाण्याचा व स्वच्छतेचा अभाव असल्याने त्यांचा वापर होत नाही. त्याकडेही प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. शौचालयांची कामे दिवाळीनंतर सुरू झाली. आता कामांना वेग आला आहे. रोजचे अहवाल येत असून, त्यात कामाची गती दिसून येत आहे. या वर्षातील लक्ष्यांक महिनाअखेर पूर्ण होईल. लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आम्ही पथनाट्य, दृक् माध्यमातून जनजागृती ग्रामपातळीवर केली. लोकांची मानसिकता बदलल्याशिवाय खºया अर्थाने यश मिळणार नाही. -राजन पाटील, उपमुख्य  कार्यकारी अधिकारी, जि.प.जलसंपदामंत्र्यांच्या मतदारसंघात बिकट स्थितीजलसंपदामंत्र्यांच्या जामनेर तालुक्यात ९२ ग्रा.पं. आहेत. यातील अपवाद वगळता एकही ग्रा.पं. हगणदरीमुक्त झालेली नाही. या तालुक्याची हगणदरीमुक्तीसंबंधीची टक्केवारी ३६.५३ एवढी आहे.