शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

दारु दुकानांना विरोध, बोदवड नगरपंचायतीवर महिलांचा मोर्चा

By admin | Updated: May 11, 2017 14:21 IST

मुख्याधिका:यांना नगरसेवकांचा घेराव

 बोदवड, जि़जळगाव,दि.11- नगरपंचायतीने भरवस्तीत दारू दुकान सुरू करण्यासह नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने संतप्त नागरिकांसह महिलांनी गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नगरपंचायतीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला़ 

उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शहरातील सर्व दारू दुकाने बंद झाल्यानंतर नवीन दुकान टाकण्यासाठी एका व्यावायिकाने नगरपंचायतीला अर्ज दिला होता़ मुख्याधिकारी डॉ़नीलेश देशमुख यांनी मात्र नाहरकत दाखला दिल्यानंतर 1 मे पासून भर वस्तीत दारू  दुकान सुरू झाल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला़
गुरुवार, 11 रोजी मासिक सभा असल्याने नागरिकांनी स्वामी विवेकानंद नगरापासून भर उन्हात पायी मोर्चा नगरपंचायतीवर आणला़ मुख्याधिकारी डॉ़नीलेश देशमुख  हे बाहेर येऊन निवेदन घेण्यास नकार देत असल्याने मोर्चेकरी अधिक संतप्त झाल़े प्रसंगी सर्व नगरसेवकांनी त्यांना त्यांच्या दालनात घेराव घातला व निवेदन घेण्यास भाग पाडला़ विशेष म्हणजे दारूबंदीला शहरातील सर्व 17 सदस्यांनी समर्थन दिले आह़े 
आंदोलनात नंदाबाई श्याम भोपळे, सुनीता सोनाजी चंदनकर, मंगलाबाई गंभीर कान्हे, शुभ्रा कदीर मन्यार, कमल अशोक माळी , ज्योती दीपक मराठे यांच्यासह शेकडो नागरिक व महिला सहभागी झाल्या़