शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

दीपनगरातील संच क्रमांक तीन कार्यान्वित

By admin | Updated: February 16, 2017 00:36 IST

१३२ मेगावॅट वीजनिर्मिती : राज्यातील ग्रीडशी संचाची झाली जोडणी

भुसावळ : महाजेनकोच्या  दीपनगरातील जुन्या प्रकल्पातील   सहा-सात महिन्यांपासून बंद असलेला संच क्रमांक तीन अखेर बुधवारी कार्यान्वित करण्यात आला. त्यातून सुरुवातीला १३२ मेगावॅट विजेची निर्मिती सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. दरम्यान, वीजनिर्मिती सुरू होताच हा संच राज्यातील ग्रीडशी जोडण्यात आल्याचे मुख्य अभियंता अभय हरणे यांनी सांगितले.दीपनगरातील जुन्या प्रकल्पातील   २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन गेल्या काही महिन्यांपासून बंद होता. हा संच कार्यान्वित करून वीजनिर्मिती करण्याची सूचना मंगळवारी दीपनगर प्रशासनाला देण्यात आली होती. सूचना मिळताच संच सुरू करण्याचे तांत्रिक सोपस्कार सुरू करण्यात आले ते पूर्ण झाल्यानंतर बुधवारी सकाळी १०.१६ वाजता संच क्रमांक तीन कार्यान्वित करण्यात आला. या संचातून सायंकाळी ५.२० वाजता १३२ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती सुरू झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तापमानात वाढ होत असल्याने राज्यातील विजेच्या मागणीत सतत वाढ होत आहे. संच क्रमांक तीन हा आरएसडी स्थितीत गेल्या सहा महिन्यांपासून होता तो आता सुरू करण्यात आला.  दीपनगरातून विक्रमी वीजनिर्मितीदरम्यान, दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातील ५०० मेगावॅटचे दोन व २१० मेगावॅट क्षमतेचा एक अशा तीन संचांमधून वीजनिर्मिती सुरू आहे. संच क्रमांक तीन-१३२, संच क्रमांक चार- ४७७, संच क्रमांक पाच- ४७८ अशी एकूण १०७८ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.दीपनगर वीजनिर्मिती केंद्रात पाणी व कोळसा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे आता बंद असलेला संच क्रमांक दोनही सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. कंत्राटी कामगारांनीदेखील तशी मागणी केली आहे. हा संच सुरू झाल्यास अस्थाई कामगारांच्या हाताला काम मिळेल, अशी भावना कामगारांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)बुधवारी राज्याची विजेची मागणी तब्बल १९  हजार  ९०४  मेगावॅट इतकी असल्याची माहिती दीपनगरातील सूत्रांकडून देण्यात आली.महानिर्मितीची वीजनिर्मिती  ७ हजार ८६१ इतकी वीजनिर्मिती होती. यात खाजगी उद्योगांची  ३ हजार ३१८ आणि केंद्राची (एनटीपीसी)  ६ हजार ९६२ मेगावॅट व पवन ऊर्जा-७९० अशी वीज वापरुन महाराष्ट्राची विजेची मागणी पूर्ण केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.