शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मनवेल येथील ऑनलाइन ग्रामसभा कोरमअभावी तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:21 IST

मनवेल, ता. यावल : मनवेल ग्रामपंचायतीने मंगळवारी आयोजित केलेल्या ऑनलाइन ग्रामसभेला ग्रामस्थ सहभागी न झाल्याने ग्रामसभा ...

मनवेल, ता. यावल : मनवेल ग्रामपंचायतीने मंगळवारी आयोजित केलेल्या ऑनलाइन ग्रामसभेला ग्रामस्थ सहभागी न झाल्याने ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली.

ऑनलाइन ग्रामसभा ही संकल्पना ग्रामीण भागातील लोकांना नवीन असल्याने किंवा याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध नसल्याने २७ लोक प्रत्यक्ष सहभागी झाले. त्यामुळे कोरमअभावी ग्रामसभा तहकूब करण्यात येत असल्याचे ग्रामसेवक भरत पाटील यांनी जाहीर केले.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात सामाजिक अंतराचा वापर करून बैठका, सेमिनार, अभ्यास वर्ग घेतले जात आहेत. याच पद्धतीने " पोखरा " योजनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून ऑनलाइन ग्रामसभा घेण्याची परवानगी शासनाने दिल्याने मनवेल येथे ऑनलाइन ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती; मात्र ती कोरमअभावी तहकूब करण्यात आली.

" पोखरा" योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून कृषी संजवनी समिती गठित करण्यासाठी ऑनलाइन ग्रामसभा आयोजित करण्यात आली, यासाठी ३० मिनिटांचा कालावधी निश्चित केला होता.

३० मिनिटांच्या कालावधीत कृषी संजीवनी समिती गठित करण्याबाबत सर्व विषयांची माहिती देण्यात आली. लोकसंख्येच्या १० टक्के किंवा कमीत कमी १०० लोकांची उपस्थिती आवश्यक असते; परंतु ऑनलाइन ग्रामसभा ही कार्यप्रणाली ग्रामीण भागातील लोकांसाठी नवीन असल्याने किंवा या ऑनलाइन सभेसाठी आवश्यक असणारे स्मार्टफोन तसेच त्यासाठी वापरण्यात येणारे ॲप अशा संगणकीय प्रणालीची माहिती ग्रामस्थांना पुरेशी माहिती नसल्याने या सभेला ऑनलाइन उपस्थित राहता न आल्याने अनेक ग्रामसभेला कोरम पूर्ण झाला नाही. यामुळे ग्रामसभा तहकूब करण्यात आली.