शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपीने बाटली मारल्याने एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2017 00:31 IST

शास्त्री नगरात प्रभाग क्रमांक 28 मध्ये रूग्णालय व शाळेच्या जवळच बियरबार व रेस्टॉरन्ट राजरोसपणे सुरू असून यामुळे नागरीक त्रस्त आहेत़

जळगाव : रामानंद परिसरातील शास्त्री नगरात प्रभाग क्रमांक 28 मध्ये  रूग्णालय व शाळेच्या जवळच बियरबार व रेस्टॉरन्ट राजरोसपणे सुरू असून यामुळे नागरीक त्रस्त आहेत़ शनिवारी रात्री येथील मद्यपींनी किरकोळ कारणावरून बार शेजारील एकाच्या नाकावर बाटली मारल्याने तो जखमी असल्याने हा बियरबार बंद करावा किंवा त्याचे अन्यत्र स्थलांतर करावे, या मागणीसाठी भाजप नगरसेवकांनी बुधवारी स्वाक्षरी मोहिम राबविली़ यात पाचशेवर नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून गुरूवारी स्वाक्षरी मोहिमेची प्रत तसेच निवेदन जिल्हाधिका:यांना देण्यात येणार आह़ेसात ते आठ महिन्यांपूर्वी हा बियरबार तसेच रेस्टॉरंन्ट सुरू झाल़े अरूंद रस्ता, बारपासून काही अंतरावर शाळा, तसेच रूग्णालय असल्याने आधीच येथील रहिवाशांचा हॉटेलला विरोध होता मात्र तरीही हॉटेल सुरू झाल़े रूग्णालयात जाणा:या महिला तसेच पुरूषांना तसेच शाळेतील विद्याथ्र्याना मद्यपींचा त्रास होत असल्याच्या तक्रारी भाजप नगरसेविका उज्वला बेंडाळे यांना देण्यात आल्या होत्या़ बुधवारी हॉटेल शेजारीच काही अंतरावर स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली़ सकाळी 11 वाजता मोहिमेला सुरवात झाली़ यावेळी नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेवक विजय गेही, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, मंडल अध्यक्ष जीवन अत्तरदे, मंडल अध्यक्ष धीरज सोनवणे, डॉ.सतीश चौधरी, डॉ.सुरेंद्र सुरवाडे, अतुल हाडा, वैशाली पाटील, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बावीस्कर, वंदना पाटील, भाग्यश्री चौधरी, बापु कुमावत, किशोर चौधरी, जयंत राणे, बापू झोपे, रेखा पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होत़े  या स्वाक्षरींची प्रत गुरूवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना सादर करण्यात येणार असल्याचे नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी सांगितल़ेमद्यपींनी बाटली मारल्याने एक जखमीहॉटेलशेजारी मनोज संतोष चौधरी हे राहतात़ मंगळवारी रात्री गोंगाट असल्याने आवाज कमी करण्याचे मनोज पाटील यांनी चार ते पाच जणांना सांगितल़े याचा राग आल्याने संबंधितांनी मनोज चौधरी यांच्या नाकावर बाटली मारली़ जखमी असल्याने त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ याबाबत रामानंद पोलिसात तक्रार देण्यात आली आह़े नेहमीचा त्रास तसेच ही घटना घडल्याने हॉटेल बंद करण्याबाबत स्वाक्षरी मोहिम राबविल्याचे नगरसेविका बेंडाळे यांनी सांगितल़े