शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप

By admin | Updated: January 20, 2016 00:50 IST

वर्षभरात निकाल : लग्नात नाचण्याचा वाद

धुळे : लग्नात नाचण्याच्या वादातून वाजंत्री पथकातील अजय पावरा या युवकाच्या खूनप्रकरणी मांजरबर्डी, ता.शिरपूर येथील आरोपी दादू पावरा याला जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.बी. घुगे यांनी मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. घटनेनंतर वर्षभरातच हा खटला निकाली निघाला, हे निकालाचे वैशिष्टय़ ठरले.

हे भांडण सोडवण्यासाठी आलेला प्रकाश काळू पावरा (रा.बुडकी खडी) याच्यावरदेखील दादूने वार केले होते. रुग्णालयात अजयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात आरोपी दादूविरुद्ध भादंवि कलम 302 व 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. खटल्यात जिल्हा सरकारी वकील व शासकीय अभियोक्ता अॅड.श्यामकांत रावजी पाटील यांनी नोंदविलेल्या आठ जणांच्या साक्षी ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी दादू पावराला भादंवि कलम 302 अन्वये दोषी धरून जन्मठेप व दोन हजार रुपये दंड, दंडाअभावी सहा महिने शिक्षा तसेच भादंवि कलम 307 अन्वये सात वर्षे शिक्षा व हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

अशी घडली घटना

बुडकीखडी, येथील अजय सुनील पावरा (वय 16) हा 1 जानेवारी 2015 रोजी लग्नात बॅण्ड वाजण्यासाठी मांजरबर्डीला गेलेला होता. त्या ठिकाणी रात्री ‘मांदल’ वाद्यात नाचण्याच्या कारणावरून आरोपी दादू उर्फ जयसिंग जंबो पावरा (40, रा.मांजरबर्डी) व अजय पावरा यांच्यात भांडण झाले. त्यात दादूने चाकूने अजयच्या छातीच्या बरगडीखाली वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.