शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जनात क्रेन उलटून एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 20:54 IST

चहार्डीच्या खदानीजवळची घटना : भल्या मोठ्या मूर्त्यांमुळे निर्माण झाल्या अडचणी

चोपडा : शहरातील विसर्जन मिरवणुकीतील गणपती मूर्ती चहार्डी येथील खदानीच्या पाण्यात क्रेनच्या साहाय्याने विसर्जित करताना क्रेन ऊलटून एक जण जखमी झाला. ही घटना ८ रोजी सकाळी घडली.येथील नवनाथ मित्र मंडळाची मुर्ती विसर्जीत करत असताना ही घटना घडली. यात चहार्डी येथील कैलास पाटील हा युवक जखमी झाला. या खदानस्थळी लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता ८ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत भल्या मोठ्या गणेश मुर्त्यांमुळे विसर्जन करणे अडचणीचे ठरत होते. ६ रोजी मिरवणूक निघाली होती. मिरवणूक जवळपास वेळेत थांबली तरी जास्तीत जास्त मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी ७ रोजीच विसर्जन होणे अपेक्षित होते मात्र ८ रोजी सायंकाळ पर्यंत विसर्जन चालले. भव्यदिव्य मूर्त्यांची प्रतिष्ठपना केल्याने विसर्जनाला अडचण निर्माण झाली म्हणून यापुढे भव्यदिव्य मुर्त्या आणण्यापेक्षा लहान मूर्ती बसवाव्यात आणि समाज प्रबोधनपर सजीव देखाव्यांवर भर द्यावा, असा सूर काही गणेश मंडळांच्या कार्यर्त्यांकडून व जाणकारांकडून निघत आहे.या अपघातामुळे अनेक मंडळाच्या गणपती मूर्ती विसर्जित करण्याचे रखडल्याने मुर्त्या चहार्डी वेले रस्त्यावरच बराच वेळ उभ्या केल्या होत्या. तर काही गणेश मंडळांनी निमगव्हाण येथील तापी नदीला भरपूर पाणी असल्याने तापीच्या पुलावरूनच मुर्त्या फेकून विसर्जन केले. हेही अनेकांच्या मनाला बोचणारे ठरले.पोलीस हवालदाराचा गौरव६ रोजी गणपती विसर्जनावेळी रात्रभर जबाबदारीने चोख भूमिका निभावली म्हणून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन मधील हवालदार लक्ष्मण शिंगाने यांचे मिरवणूक आटोपल्यानंतर पालिकेसमोरील पटांगणात पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी गौरव केला. अधिकृत गौरवपत्र पाठविले जाईल, असे जाहीर केले. तसेच शेतकी संघाचे माजी अध्यक्ष हिम्मतसिंग पाटील यांनीही सहकार्य केले.चोपडा पालिकेने विसर्जनासाठी करावी व्यवस्थाचोपडा शहरातील भव्यदिव्य गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यासाठी नगरपालिकेने व्यवस्था करावी, अशी मागणी गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच मंडळांकडून पालिकेने प्रत्येकी २०० रुपये घेतले असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले. चहार्डी येथील खदानीजवळ क्रेन उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही पालिकेची असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.