शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मेवा खाल्ला एकाने; जेलची हवा दुसऱ्यालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST

जळगाव : बनावट कागदपत्रे तयार करुन उज्ज्वला गॅस एजन्सीची डीलरशीप देण्याच्या नावाखाली कालिदास विलास सूर्यवंशी (वय ३३,रा.दहिगाव, ता.यावल) या ...

जळगाव : बनावट कागदपत्रे तयार करुन उज्ज्वला गॅस एजन्सीची डीलरशीप देण्याच्या नावाखाली कालिदास विलास सूर्यवंशी (वय ३३,रा.दहिगाव, ता.यावल) या तरुणाला १० लाख ३३ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणारा मास्टरमाईंड वेगळाच असून पोलिसांनी अटक केलेले सुनीलकुमार सहानी ब्रह्मदेव ऊर्फ अनिलकुमार (वय ३८,रा.तेजपूर, बिहार) व कन्हैय्या कुमार सहानी राजेंदर सहानी (वय ४३, कोलकाता) हे तर मजुरी करणारे निघाले आहेत. मेवा खाणारा वेगळा तर जेलची हवा खाणारे वेगळेच निघाले आहेत.

आशितोष कुमार नाव सांगणाऱ्या व्यक्तीने कालिदास सूर्यवंशी यांना उज्ज्वला गॅस एजन्सीची डीलरशीप देतो असे सांगून खोटी कागदपत्रे तयार केली व ती एका वेबसाईटवर पाठवून वेगवेगळ्या कारणासाठी ए.यु.स्मॉल फायनान्स लि.या बँकेचा युपीआय आयडीद्वारे बारकोड स्कॅन करुन वेळोवेळी १० लाख ३३ हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले होते. सायबर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सुनीलकुमार सहानी व कन्हैय्याकुमार सहानी या शालक-मेहुण्याची जोडी निष्पन्न झाली. सीबीआय, पठाणकोठ पंजाब, झांशी पोलिसांनीही देखील यापूर्वी या दोघांना अटक केली आहे. गुन्ह्यात या दोघांच्या कागदपत्राचा वापर झालेला असला तरी प्रत्यक्षात आर्थिक फायदा हा दुसऱ्यालाच झाला असून ती व्यक्ती अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. अटकेतील दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अशी आहे गुन्ह्याची पद्धत

शहर, गावात मजुरी करणारे किंवा रस्त्यावर पाणीपुरी विक्री तसेच इतर व्यवसाय करणाऱ्यांना हेरुन त्यांच्याशी सलगी वाढविली जाते. त्यांच्याकडून वारंवार वस्तू खरेदी करणारे, किरकोळ मदत मिळवून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करुन या लोकांचे आधारकार्ड व इतर कागदपत्रे घेतली जातात. तुझ्या बँक खात्यावर पैसे मागवायचे आहे, असे म्हणत त्यांना किरकोळ पैसे दिले जातात. नंतर परस्पर ऑनलाईन पैसे काढले जातात. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला तरी कागदपत्रावर नावे असलेलेच अडकतील हा त्यामागचा उद्देश आहे. अशाच पद्धतीचा गुन्हा जळगावात महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या योजनेत झालेला आहे.

कोट...

या गुन्ह्यात मुख्य आरोपी हा दुसराच आहे. फसवणुकीच्या पैशाचा फायदाही त्यालाच झालेला आहे. त्याचे अपूर्ण नाव मिळालेले आहे. अजून तरी शोध लागलेला नाही, परंतु पथक त्याच्या मागावर आहे.

-बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा