शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहा कोटीच्या अपहार प्रकरणात एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:14 IST

जळगाव : बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट कागदपत्राद्वारे बीज भांडवल योजनेचे बोगस कर्ज प्रकरण करून महात्मा फुले मागासवर्गीय विकास ...

जळगाव : बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट कागदपत्राद्वारे बीज भांडवल योजनेचे बोगस कर्ज प्रकरण करून महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनेत साडेसहा कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात संदीप प्रभाकर सावळे (वय ३६, रा. भुसावळ) याला आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. या साडेसहा कोटी रुपयांपैकी तब्बल १ कोटी ३ लाख रुपये साबळे याच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत.

शासकीय योजनेचा अपहार झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर महात्मा फुले मागासर्गीय विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वैशाली अनिश जाधव यांच्या फिर्यादीवरून २ ऑगस्ट २०१९ रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात याआधी महामंडळाचा व्यवस्थापक खंडू विठोबा लोहकरे (वय ४६, रा. नाशिक), अकाैंटंट सागर वसंत अडकमोल (वय ३९, रा. रविराज कॉलनी), सुनंदा बाबूराव तायडे (वय ५९, रा. वानखेडे हौसिंग सोसायटी), प्रकाश लक्ष्मीकांत कुळकर्णी (रा. राधाकृष्ण नगर), अमरीश अनिल मोकाशी (रा. सदगुरू नगर) व संजीव वसंत सोनवणे (रा. भुसावळ) यांना अटक झालेली आहे. तसेच मुकेश देवराम बारमासे (रा. नागपूर) यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. महामंडळाने केलेल्या चौकशीत ७०२ बोगस लाभार्थी दाखवून महामंडळाचे अधिकारी, बँक अधिकारी, कर्मचारी व ४० ते ५० एजंट अशांनी बोगस कागदपत्राद्वारे बोगस लाभार्थी दाखवून साडेसहा कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी ‘लोकमत’ ला दिली.

दरम्यान, अटकेतील साबळे याला न्यायालयात हजर केले असता २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.