शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बुट विक्री करणार्‍या वृध्दाला चौघांनी लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:16 IST

जळगाव : शहरात बुट विक्रीचा व्यवसाय करणार्या बाबुलाल डिगंबर निंबोरे (वय ७१)या परप्रांतीय वृध्दाला रिक्षात बसून चौघांनी दमदाटी ...

जळगाव : शहरात बुट विक्रीचा व्यवसाय करणार्या बाबुलाल डिगंबर निंबोरे (वय ७१)या परप्रांतीय वृध्दाला रिक्षात बसून चौघांनी दमदाटी करुन त्याच्याकडील ४ हजार ५०० रुपये रोख व मोबाईल असा एकूण ५ हजार ६०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील बोरी येथील मुळ रहिवाशी असलेले बाबुलाल डिगंबर निंबोरे हे बुट विक्री व्यवसायानिमित्ताने शहरात आले आहेत. २० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राजकमल चौक येथे रिक्षाची प्रतीक्षा करीत होते. एका रिक्षात बसल्यानंतर आधीच त्यात चौघे जण बसलेले होते. त्यातील एकाने खाली उतरुन निंबोरे यांना इतरांच्या मधोमध बसविले. राजकमल चौक सोडताच चौघांनी निंबोरे यांच्या खिशातील ४ हजार ५०० रुपयांची रोकड व १ हजार १०० रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ५ हजार ६०० रुपयांचा ऐवज बळीजबरीने काढून घेत निंबोरे यांना बी.जे. मार्केटसमोर झिपरु अण्णा समाधी जवळ रिक्षातून उतरवून दिले आणि चौघे पसार झाले. याप्रकरणी २३ फेब्रुवारी रोजी निंबोरे यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन चौघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे करीत आहेत.