शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बदलीतून सवलतीसाठी दोघा शिक्षकांनी मिळविले अस्थिव्यंगाचे बनावट प्रमाणपत्र

By admin | Updated: April 26, 2017 00:22 IST

दोघे 15 वर्षे ठाण मांडून : नगर जिल्ह्यातील कारवाईचा जि.प. बोध घेणार का?

जळगाव : तालुक्यातील दोन  शिक्षकांनी बदलीतून सूट मिळावी यासाठी अस्थिव्यंगाबाबत बनावट प्रमाणपत्र जिल्हा सामान्य रुग्णालयातून मिळविले असून, हे प्रमाणपत्र शिक्षण विभागाकडे सादर करून त्यांची दखल घेऊन संबंधित शिक्षकांना बदलीतून सूट मिळण्यासंबंधीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या दोन्ही शिक्षकांपैकी एक शिक्षक हे सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दोन्ही  शिक्षक जि.प.शाळांच्या सेवेत असल्यापासून जळगाव तालुक्यातच आहेत. 15 वर्षे ते तालुक्यातून बाहेर गेलेले नाहीत. शासनाने अलीकडेच अस्थिव्यंगांना बदलीतून सूट दिली जाईल, असे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाचा आधार घेऊन बदलीतून सूट मिळावी यासाठी बनावटी अस्थिव्यंगाचे प्रमाणपत्र मिळविण्याचा सपाटा  शिक्षकांमध्ये सुरू आहे. नगर जिल्ह्यातही बनावटी अस्थिव्यंग प्रमाणपत्रांचा बाजार  जि.प.च्या शिक्षकांनी मांडला होता. या प्रकरणाची दखल सीईओ यांनी घेतली. तेथे जि.प.च्या 30 दोषी शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. बदलीपात्र 153 ग्रामसेवकांची यादी जाहीरजि.प.च्या ग्रा.पं. विभागाने बदलीस पात्र 153 ग्रामसेवकांची यादी जाहीर केली आहे. एकाच तालुक्यात 10 वर्षांपेक्षा अधिक सेवा केलेल्या ग्रामसेवकांची ही यादी आहे. या यादीवर संबंधितांना येत्या 28 तारखेर्पयत हरकती घेता येईल. आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन, शुक्रवारी सुरुवातजिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेला 28 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.  या बदल्या ऑनलाईन पध्दतीने केल्या जाणार आहेत. शिक्षकांना 28 एप्रिलपासून शिक्षण विभागाच्या पोर्टलवर आपली सर्व माहिती ऑनलाईन पध्दतीने भरावयाची असल्याची माहिती जि.प.प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी दिली.