शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराचा माल रात्रीतून बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 12:07 IST

जि़प़सदस्यांचा आरोप : शिक्षण विभागाने पाळधी येथील गोदामातून घेतले नमुने

ऑनलाईन लोकमत 

जळगाव,दि.2 - भुसावळ तालुक्यातील गोजोरे व कु:हे पानाचे येथील शालेय पोषण आहाराचे नमुने घेतल्यानंतर शिक्षण विभागाने शनिवारी जिल्हा परिषद सदस्यांसह पाळधी येथील पोषण आहाराच्या गोदामाची पाहणी केली़ दोन्ही ठिकाणच्या नमुन्यांमध्ये तफावती आढळून आल्या असून पुरवठादाराने रात्रभरात गोदामातील  माल बदलला असल्याचा संशय जि़प़सदस्यांनी व्यक्त केला आह़े शुक्रवारी व शनिवारी घेतलेले नमुने तपासणीसाठी अन्न व औषध विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत़
जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी केलेल्या तपासणीत शालेय पोषण आहार निकृष्ट असल्याचे आढळून आले होत़े त्यानंतर त्यांनी याबाबत सीईओ कौस्तुभ दिवेगावकरांकडे तक्रार केली होती़ तक्रारीनंतर शिक्षण विभागाने गोजोरे व कु:हे येथील पोषण आहाराचे नमुने ताब्यात घेतले होत़े शनिवारी सीईओ यांच्या आदेशानुसार प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी डी़एम़देवांग यांनी साई मार्केटिंग अॅण्ड ट्रेडिंग कंपनी या पुरवठादाराच्या पाळधी येथील गोदामामधून पोषण आहाराचे नमुने घेतल़े यावेळी त्यांच्यासोबत शिक्षण सभापती पोपट भोळे, जि़प़सदस्य पल्लवी सावकारे, सदस्य गजेंद्र सोनवणे, सदस्य नानाभाऊ महाजन, सदस्या माधुरी अत्तरदे उपस्थित होत्या.
दोन्ही ठिकाणच्या नमुन्यांमध्ये तफावत
शिक्षण विभागाने पाळधी येथील गोदामातून  मुंगदाळ, वटाणा, तुरदाळ, मटकी या आहाराचे नमुने घेतल़े गोजोरे व कु:हे येथून घेतलेल्या व गोडाऊनमधील नमुन्यांमध्ये तफावती आढळून आल्या़ गोडाऊनमधील नमुने निकृष्ट नसल्याचे जि़प़सदस्यांनी सांगितल़े मात्र चांगला माल गोडाऊनमध्ये ठेवून शाळांमध्ये निकृष्ट आहार आढळून आल्याने मक्तेदाराने शिक्षण विभागाची तपासणीची कुणकुण लागल्याने रात्रभरात माल बदलला असल्याचा संशय सदस्या पल्लवी सावकारे, सदस्य नानाभाऊ महाजन यांनी व्यक्त केला आह़े