शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

न.पा. विद्युत कर्मचाऱ्याला महिलांनी केली धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST

अमळनेर : येथील नगर परिषदेच्या विद्युत विभागाचे कर्मचारी आबिद शेख यांना रात्रीच्या सुमारास आपले कर्तव्य बजावताना फरशी रोडवर महिलांकडून ...

अमळनेर : येथील नगर परिषदेच्या विद्युत विभागाचे कर्मचारी आबिद शेख यांना रात्रीच्या सुमारास आपले कर्तव्य बजावताना फरशी रोडवर महिलांकडून धक्काबुक्की व शिवीगाळ झाल्याने न. पा. कर्मचारी संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे.

न. पा. कर्मचारी आबिद शेख हे विद्युत विभागात कार्यरत आहेत. २६ मे रोजी रात्री ९ वाजता ते गांधलीपुराजवळील नवीन फरशी पुलावर कृषिभूषण मार्गावर पथदिवे चालू बंद स्थितीत पाहण्यासाठी गेले असताना काही महिला त्याठिकाणी आल्या आणि तू काय करीत आहेस, अशी विचारणा करून त्याला शिवीगाळ करत मोबाइल हिसकण्याचा या महिलांनी प्रयत्न केला. तसेच धक्काबुक्की केली. यावेळी शेख यांनी या प्रभागाचे नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांना बोलावले. तरीही महिलांनी शिवीगाळ सुरूच ठेवली.

कर्मचारी संघटना आक्रमक

सदर प्रकाराचा आम्ही सर्व न.पा. अधिकारी आणि कर्मचारी जाहीर निषेध करीत असल्याचे कर्मचारी इंटक संघटनेचे अध्यक्ष प्रसाद शर्मा, जनरल सेक्रेटरी सोमचंद सदानशिव यासह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सदर प्रकार अवैध व्यवसायात काही तरी बाधा येत असल्याने झाला असल्याची चर्चा असून, परिसरातील नागरिकदेखील या घटनेचा निषेध नोंदवित आहेत.