शेतकरी बांधवांतर्फे दिवसा विज पुरवठा होण्याबाबत अनेकवेळा मागण्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, कायम स्वरूपी दिवसा विज पुरवठा दिल्यावर सब स्टेशन ओव्हलोड होऊन सिस्टीम ढासळण्याची शक्यता असल्याने दिवसा विज पुरवठा देणे टाळण्यात येत आहे. या संदर्भात शासनाने दिवसा विज पुरवठा करण्यासाठी सर्वच यंत्रणा दुप्पट करण्याची शेतकऱ्यांची मागणी असून, याबाबत शासनाने कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे शेतकऱ्यांमधुन नाराजी निर्माण होत आहे.
रात्रीचे भारनियमन जीवघेणेच :
दिवसभर शेतात राबराब राबुन, पुन्हा बागायतदार शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यायला जावेच लागते. रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी देतांना कुठल्याही स्वरूपाचा अपघात घडण्याची शक्यता असते. , रानडुक्कर, बिबट्या यासह साप व इतर हिंस्र पाण्याचा हल्ला होण्याची भिती असते. तसेच विजेचा शॉक लागण्याचीही भिती असते.
इन्फो :
शेतकऱ्यांना दिवसा शेतात काम करून, पुन्हा रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. रात्रीच्यावेळी काम करतांना हिस्त्र प्राणी किंवा इतर जलचर प्राण्यांचा धोका असतो. मात्र, तरीदेखील शेतकरी बांधव जीव धोक्यात घालून पिकांना देतात. शासनाने बाराही महिने दिवसा विज पुरवठा देणे गरजेचे आहे.
कशोर चौधरी, शेतकरी.
इन्फो :
शेतकरी बांधवांना विज पुरवठा करण्यासंदर्भात हे राज्य पातळीवरच धोरण ठरविण्यात येते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला विज पुरवठा करण्यात येतो, शेतकऱ्यांना कायम स्वरूपी दिवसा विज पुरवठ्याबाबत शासन स्तरावरच निर्णय घेण्यात येईल.
फारुख शेख, अधिक्षक अभियंता, महावितरण.
चांगला पाऊस झाल्याने मुबलक पाणी :
गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही चांगला पाऊस झाल्याने, विहिरी फुल्ल भरलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच शेतकरी आता जुन पर्यंत वर्षभर पिके घेतील. पावसाळी हंगाम संपल्यानंतर आता हिवाळी हंगामासाठी तयारी करतील. उन्हाळी हंगामातील पिकांना जास्त भाव मिळत असल्याने, शेतकरी गहू व हरभरा पिके काढण्यावर जास्तीत जास्त भर देतात.
- जळगाव तालुक्यात गिरणा नदी असल्यामुळे या नदीचाही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. नदीच्या परिसरातील विहिरींना बाराही महिने मुबलक पाणी असते. पाऊस कमी पडला तरी या विहरींना वर्षभर पाणी असते. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्षभर पिके घेतात. दरम्यान, यंदा पाऊस चांगला झाला असल्यामुळे नदीलाही जास्त आवर्तने सोडण्यात येणार असल्याने यंदा पाणी मुबलक राहणार आहे.