शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नवीन 9 तलाठी सजांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 14:03 IST

भडगाव तालुका : कामाचा ताण कमी करण्यासाठी शासनाचा निर्णय

ठळक मुद्दे31 तारखेर्पयत मागविल्या हरकती सजे वाढल्याने नागरिकांची होणार सोय

भडगाव : वाढती लोकसंख्या, अपूर्ण तलाठी सजे यामुळे महसूल विभागाचा कामाचा व्याप वाढत आहे. यासाठी वाढीव तलाठी सजेची  संख्यावाढीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.   यानुसार तालुक्यात नवीन 9 तलाठी सजेची निर्मिती  झाली आहे.  तसेच आदेश तहसीलला मिळाल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी दिली.पूर्वी 26 तलाठी सजे होते. त्यामुळे एका तलाठी सजेवर  अनेक गावांचा भार असल्याने तलाठय़ांवरील कामाचा ताण अधिक  होता. नागरिकांचीही गैरसोय होत होती. तलाठी कार्यालयही काही वेळेस बंद राहात असे. आता नवीन तलाठी सजे झाल्यावर तलाठय़ांचाही ताण कमी होणार आहे. गावाची लोकसंख्या वाढली मात्र 26 तलाठी सजे जैसे थे होते. सर्व परिस्थिती पाहता तत्कालिन प्रांत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली गेली. यात तहसीलदार सी.एम.वाघ, निवासी नायब तहसीलदार मुकेश हिवाळे यांचाही समावेश होता.  ऑगस्ट 2017 मध्ये नवीन तलाठी सजे वाढविण्याबाबत जिल्हाधिका:यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. यानुसार नवीन 9 तलाठी सजे प्रस्तावित केले आहेत.भडगावला पूर्वी एक तलाठी होता आता नवीन दोन तलाठी सजे वाढल्याने 36 हजार लोकसंख्येला तीन तलाठी सजे राहणार आहेत. गुढय़ाला एक तलाठी होता आता गावाचे दोन भाग करुन नवीन एक तलाठी सजा वाढणार आहे. कजगावला एक तलाठी कार्यरत होता, आता नव्याने गावाचे दोन भाग मिळून एक नवीन तलाठी वाढून दोन तलाठी सजा होणार आहे. मात्र कजगाव 2 भागाला पासर्डी गाव जोडण्यात आले आहे,नवीन तांदूळवाडी तलाठी सजा असून या सजेला  मळगाव जोडले आहे. नवीन लोण प्र.भ सजा असून यात नावरे, घुसर्डी, दलवाडे ही गावे जोडली आहेत. नवीन बांबरुड प्र.ऊ. ला सजा झाली असून यात मांडकी, भट्टगाव ही गावे जोडली आहेत. नवीन कोठली तलाठी सजा असून यात वडधे जोडले आहे. तालुक्यात नवीन 9 तलाठी सजे वाढल्याने महसूल विभागाच्या कामास गती मिळणार आहे. नागरिकांचीही मोठी सोय होणार आहे.  मागील 24 तलाठी सजे व नवीन 9 तलाठी सजे असे मिळून एकूण 33 सजे तालुक्यात होणार आहे.याबाबत शासन आदेशाच्या याद्या तहसील कार्यालयास मिळाल्या असून या याद्या भडगाव पंचायत समिती, तलाठी सजा, ग्रा.पं. कार्यालयारत प्रसिध्दीसाठी  लावल्या आहेत. 31 र्पयत नागरिकांच्या हरकती घेण्याची मुदत असल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिली.आता 6 तलाठी सजांसाठी एक महसूल मंडळ या तत्वानुसार पुन्हा वाढीव तलाठी सजेसाठी नव्याने नवीन दोन महसूल मंडळे स्थापन केली जाणार आहेत. तसा प्रस्तावही जिल्हाधिका:यांकडे पाठविला जाणार आहे.  सध्या चार महसूल मंडळे असून तालुक्यात नवीन दोन महसूल मंडळे वाढून  6 महसूल मंडळे प्रस्तावित होऊ शकतात, अशी माहिती महसूल विभागाने दिली. नवीन  9 तलाठी  सजामध्ये पुढीलप्रमाणे गावांचा समावेश केला आहे. भडगाव  2, टोणगाव 2, गुढे 2, पिचर्डे, कजगाव, तांदूळवाडी, लोण प्र.भ., बांबरुड प्र.ऊ. , कोठली .