शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

केळी निर्यात, फळनिगा तंत्रज्ञानासाठी अनुदान व पॅकहाऊस उभारणीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST

रावेर : केळी उत्पादन संबंध भारतातून होत असले तरी जळगावच्या केळीत असलेला टिकाऊपणा, लुसलुसीत व सोनेरी तजेलदारपणा, केळीचा पारंपरिक ...

रावेर : केळी उत्पादन संबंध भारतातून होत असले तरी जळगावच्या केळीत असलेला टिकाऊपणा, लुसलुसीत व सोनेरी तजेलदारपणा, केळीचा पारंपरिक स्वाद व असलेली खनिजसमुद्राची मुबलकता तथा सतत वर्षभर केळी निर्यातीसाठी असलेली मालाची उपलब्धता पाहता केळी निर्यातीला चालना देण्यासाठी शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना आंध्र प्रदेश व व मध्य प्रदेश शासनाप्रमाणे फळनिगा तंत्रज्ञानासाठी शासन अनुदान व पॅकहाऊस उभारणीची गरज असल्याचे मत केळी निर्यातदार शेतकरी विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केले.

नाशिक जिल्ह्यातील मोहाडी (ता. दिंडोरी) येथे शासनाच्या कृषी विभागाने आयोजित केलेल्या कृषी संजीवनी मोहिमेतील विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत शेतमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ होते.

मोहाडी येथे शासनाच्या कृषी विभागाद्वारे कृषी संजीवनी मोहिमेतील ‘विकेल ते पिकेल’ राज्यस्तरीय शेतमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कार्यशाळेचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

प्रारंभी भुसे, झिरवाळ, कृषी आयुक्त, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, नाशिक येथील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी जळगाव जिल्ह्यातील केळी निर्यातदार शेतकरी प्रेमानंद महाजन, प्रशांत महाजन, विशाल अग्रवाल, वरुण अग्रवाल व देसाई एक्सपोर्ट कंपनीचे नरेश चौधरी यांनी जिल्ह्यातील केळी निर्यातीची विशेषत: व त्यासाठी शासनाकडून अत्यावश्यक असलेल्या शासनाच्या धोरणात्मक निर्णयांची अपेक्षा याबाबत सविस्तर विवेचन या केळी निर्यातदार शेतकऱ्यांनी विशद केले.

दरम्यान, राज्यभरातील शेतमाल निर्यातदार शेतकऱ्यांतर्फे केळी निर्यातदार शेतकऱ्यांतर्फे विशाल अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी शासनाचा कोणताही आधार नसताना सुमारे दोन दोन लाख मेट्रिक टन केळी जिल्ह्यातून निर्यात केल्याची बाब अभिमानाने सादर करून शासनाने आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश शासनाप्रमाणे फळनिगा तंत्रज्ञानासाठी शासन अनुदान अदा करावे व केळी उत्पादक क्षेत्रात पॅक हाऊसची, कोल्ड स्टोरेज व प्रिकुलिंग स्टोअरेज उभारण्याचे गरज असल्याचे मत व्यक्त केले.

दरम्यान, केळी निर्यातदार शेतकरी प्रेमानंद महाजन, प्रशांत महाजन, विशाल अग्रवाल व वरूण अग्रवाल यांनी कृषिमंत्री दादा भुसे व राज्य विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निर्यातक्षम व गुणात्मक दर्जाची निर्यातीसाठी पॅकेजिंग केलेल्या केळीचा बॉक्स प्रदान केला.