हा प्रवाह वाढत वाढत तो ९० हजार ते १ लाख क्युसेकपर्यंत वाढला. पाण्याचा प्रवाह इतका भयानक होता की, त्याने पूर्ण नांद्रे गावाला वेढा दिला. अचानक वाढलेल्या नदीच्या प्रवाहामुळे नांद्रे येथील सर्व ग्रामस्थांनी मंगळवारची रात्र अक्षरश: जागून काढली. संपूर्ण गाव भयभीत झाले. नदीचा प्रवाह बदलला. एक मार्ग जाणारा प्रवाह हा गावाच्या वरच्या भागाकडून दोन भागात विभागला गेला. त्यामुळे गावाला वेढा बसून शेतातूनच नदीने मार्गक्रमण करीत शेतात उभ्या असलेल्या ऊस, कपाशी, केळी, पपई ही पिके अक्षरश: पाण्यात वाहून गेली. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून नदीने प्रवाह बदलला, त्या शेतकऱ्यांची शेतातील मातीच वाहून गेली. तेथे नदीचा आकार तयार झाला तर काही शेतकऱ्यांचे पाणी उपसण्याच्या मोटारी, इलेक्ट्रिक पोल, तार, पाइपलाइन, ठिबकच्या नळ्या वाहून गेल्यात.
रवींद्र शिवराम पाटील, बाळासाहेब मांगो पाटील, नलिंद्र दयाराम पाटील, भाऊसाहेब नाना पाटील, बाळकृष्ण जगन्नाथ पाटील, चंद्रकांत पुंडलिक पाटील, बाळासाहेब भगवान पाटील, रामभाऊ दयाराम पाटील, सीताराम तुकाराम पाटील, हरिदास भिला पाटील, सुरेश भिला पाटील, ज्ञानेश्वर धर्मा पाटील तसेच इतर काही शेतकऱ्यांचे ऊसाचे व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रवींद्र पाटील व बाळासाहेब पाटील, शिरसाठ तलाठी यांच्या शेतात तर मातीच राहिली नाही. त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले तर काही शेतकऱ्यांच्या गायी व म्हशी तसेच पत्र्याचे शेड पुरात वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. १९७२ पासून मन्याड धरणाची निर्मिती झाली, तेव्हापासून तर आजपर्यंत कधी न पाहिलेला महापूर प्रथमच बघायला मिळाला.
सकाळीच मन्याडवरील माणिकपुंज धरण फुटल्याची अफवा कानावर येताच सर्व ग्रामस्थांनी गाव सोडून जवळच असलेल्या काकडणे रस्त्याकडील भिल्ल वस्तीच्या टेकडीचा आधार घेत काही तासांत गाव खाली केले. नंतर दुपारी १२-१च्या दरम्यान नदीचा पूर ओसरलेला पाहून तसेच माणिकपुंज फुटल्याची अफवा असल्याची खात्री करून नंतर गाव व परिसरात अजून किती नुकसान झाले आहे, याची माहिती घेत होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी दुपारी नांद्रे सायगावला भेट देत नुकसानाची पाहणी केली.
080921\08jal_13_08092021_12.jpg~080921\08jal_14_08092021_12.jpg~080921\08jal_15_08092021_12.jpg
गावातील ग्रामस्थांनी ठिक ठिकाणी टेकडीवर असा शेडचा आडोसा घेतला.पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण ऊसच मुळासकट उपटला.पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली.~गावातील ग्रामस्थांनी ठिक ठिकाणी टेकडीवर असा शेडचा आडोसा घेतला.पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण ऊसच मुळासकट उपटला.पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली.~गावातील ग्रामस्थांनी ठिक ठिकाणी टेकडीवर असा शेडचा आडोसा घेतला.पाणी शेतात घुसल्याने संपूर्ण ऊसच मुळासकट उपटला.पुरामुळे शेतातील मातीच वाहून गेली.