शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6- जळगाव शहरातील रस्त्याचे चौपदरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2017 21:29 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चा जळगाव शहरातून जाणाऱ्या 15.4 कि.मी लांबीच्या मार्गाचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

ऑनलाइन लोकमत 
 जळगाव, दि.14-  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 चा जळगाव शहरातून जाणाऱ्या 15.4 कि.मी  लांबीच्या मार्गाचा  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चौपदरीकरणासह समांतर रस्त्या (सर्व्हिस रोड) सह विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत आज जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे झालेल्या बैठकीत प्रकल्प अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. आवश्यक सुचनांच्या समावेशानंतर या प्रकल्प अहवालाचा प्रस्ताव मार्गी  लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी अग्रवाल यांच्या दालनात हे सादरीकरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे धुळे येथील प्रकल्प संचालक अरविंद काळे, प्रकल्प व्यवस्थापक अरविंद गंडी, प्रकल्प सल्लागार अजय पोफाळकर तसेच निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांची उपस्थिती होती.  
यावेळी झालेल्या सादरीकरणात माहिती देण्यात आली की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या चौपदरीकरणाचे काम  अमरावती ते गुजरात सिमेपर्यंत होत आहे. या कामाचे दोन टप्पे करण्यात आले असून चिखली ते तरसोद व तरसोद ते फागणे हे ते दोन टप्पे आहेत.  तरसोद ते फागणे या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील महामार्गाचा समावेश आहे. त्यात जळगाव शहरातून जाणारा अस्तित्वातील महामार्गाचे चौपदरीकरण व  त्या लगत असणाऱ्या सर्व्हिस रोडच्या कामांचा समावेश आहे. हे काम स्वतंत्ररित्या होत आहे. मुळ कामात जळगाव शहराबाहेरुन वळण रस्ता जाणार आहेच. त्याव्यतिरिक्त जळगाव शहरातील रस्त्याचेही काम आता होत आहे. 
 या कामात 15.4 किमी रस्त्याचे (तरसोद ते पाळधी फाटा) चौपदरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.   या रस्त्याची रुंदी 60 मिटर असेल. 60 मिटर रुंदीची जागा 10 किमी लांबीसाठी उपलब्ध आहे. त्यानुसार या रस्त्यासाठी  गिरणा नदीवर दोन समांतर नवे पूल. रेल्वे ओव्हरब्रीजच्या बांधकामाचा समावेश आहे. तसेच दोन्ही बाजूचे सर्विस रोड,  10 ठिकाणी व्हेईकल अंडरपास मार्ग (वाहनांचा भुयारी मार्ग) तसेच 20 ठिकाणी पादचाऱ्यांसाठी  भुयारी मार्गिका असेल. शिवाय दोन ठिकाणी (आकाशवाणी चौक व आयटीआय जवळ) लोअर्ड हायवे करण्यात येईल.  तर कालिकादेवी चौकात फ्लाय ओव्हर प्रस्तावित करण्यात आला आहे.  रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 7 मिटरचा सर्व्हिस रोड असेल, त्यासोबतच 2 मिटरचा फुटपाथही असेल. शिवाय जेथे 60 मिटर रुंद जागा उपलब्ध असेल अशा ठिकाणी  (सुमारे 10 किमी लांबीचा) सायकल ट्रॅकही केला जाणार आहेत. या शिवाय रस्त्याच्या सुशोभिकरणासाठी लॅण्डस्केपिंग, वृक्ष लागवड, रस्त्याच्या मधोमध एलईडी पथदिवे, चौकांमध्ये हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत. 
 यावेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी रस्त्यांच्या दिव्यांसाठी सौर उर्जेचा वापर करणे, रस्त्याच्या कडेला ठराविक अंतरावर स्वच्छता गृहे, पोलीस व आपत्ती मदत केंद्र तयार करावेत अशा सुचना केल्या. या कामाची प्राथमिक किंमत 450 कोटी रुपयांची असून त्यात आवश्यक सुचनांचा समावेश करुन या प्रस्तावाला अंतिम स्वरुप दिले जाईल, असे जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी सांगितले.  त्यासाठी जिल्हाप्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान येत्या 27 तारखेपासून महामार्गालगत अतिक्रमण हटविण्याच्या कामांना सुरुवात होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.