लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीतर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ शिक्षकांना नेशन बिल्डर ॲवार्ड प्रदान करून सन्मानीत करण्यात आले. हा सन्मान सोहळा गणपती नगरातील रोटरी हॉल येथे पार पडला.
यावेळी प्रांतपाल रमेश मेहेर, माजी प्रांतपाल राजीव शर्मा, अध्यक्ष उमंग मेहता, माजी मानद सचिव सुनील आडवाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात रोटरी गोल्डसिटीतर्फे पुरस्कारासाठी शिक्षकांकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता समाजमाध्यम, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया तसेच पालकांकडून आलेल्या प्रतिसाद यावर सत्कारार्थी शिक्षकांची निवड करण्यात आली, अशी माहिती प्रांतपाल मेहेर आणि राजीव शर्मा यांनी दिली. सूत्रसंचालन अशोक सौंदाणे यांनी तर परिचय चंदर तेजवानी यांनी करून दिला. आभार नंदू आडवाणी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यश रावलानी, दिनेश राठी, प्रखर मेहता, नीलेश जैन आदींनी परिश्रम घेतले.
शिक्षकांचा कुटुंबीयांसह सन्मान
सोहळ्यात सुचिता बाविस्कर (मनपा शा.क्र.३८), सुनीता शिमाले (क्रीडा रसिक सोसा.संचालित प्राथ.शाळा), जयश्री पाटील (चांदसरकर शाळा), अनिल शितोळे (नूतन मराठा विद्यालय), किरण चौधरी (भगीरथ विद्यालय), नरेंद्र वारके (क. रा. वाणी बालनिकेतन), मनोहर तेजवाणी (आदर्श सिंधी विद्यालय), सागर झांबरे (शारदा शाळा), राजेंद्र पाटील (शिक्षण शास्त्र विद्यालय, नूतन कॉलेज प्रांगण) आदी नऊ शिक्षकांना पुरस्कार, शाल, श्रीफळ प्रदान करून कुटुंबीयासह सन्मानित करण्यात आले.