शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादचे सीसीटीव्ही कॅमेरे बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

नशिराबाद : ग्रामपंचायतीने मोठा गाजावाजा करीत शहरातील मुख्य चौकात व रस्त्यांवर बसवलेली सुमारे ५६ सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून ...

नशिराबाद : ग्रामपंचायतीने मोठा गाजावाजा करीत शहरातील मुख्य चौकात व रस्त्यांवर बसवलेली सुमारे ५६ सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. संपूर्ण शहराकडे लक्ष ठेवणाऱ्या या ‘डोळ्यांना मोतीबिंदू’ झाला असून याचे ‘ऑपरेशन’ दुरुस्ती होणार केव्हा? असा उपहासात्मक प्रश्न केला जात आहे.

गावाच्या कायदा सुव्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी गावात विविध चौका-चौकात ग्रामपंचायतीतर्फे लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगराणीत होते. गावात कुठे काही घटना घडामोडी घडली तर सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून घटनेतील संशयितांचा शोध घेणे पोलिसांना सोयीचे ठरत होते. मात्र आता गावातील कॅमेरे बंद आहे. वादळ, वारा यामुळे काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरी पण तुटल्या आहेत. लाखो रुपये खर्च करून गावाच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या कार्यप्रणालीची देखभाल ग्रामपंचायतीने करायला पाहिजे. मात्र त्यासाठी अनास्था असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बस स्टॅन्ड, शिवाजी चौक, ग्रामपंचायत, होळी मैदान, मेनरोड, साती बाजार यासह विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले होते. या कॅमेऱ्याचे संपूर्ण डीव्हीआर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले मात्र गेल्या काही महिन्यांपासून सीसीटीव्ही कॅमेरा दुरुस्ती अभावी बंद पडलेले आहे. ग्रामपंचायतीने याबाबत त्वरित दखल घ्यावी व उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.