शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

गोंगाटातही साधला जातोय नेम

By admin | Updated: March 4, 2017 12:55 IST

दोन आंतरराष्ट्रीय नेमबाज, ७० ते ८० राष्ट्रीय खेळाडू आणि पाच हजारांच्या वर इतर खेळाडू घडले, ते ही शूटिंग रेंजशिवाय. ही कामगिरी जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनने करून दाखवली आहे.

जळगाव : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू घडवूनही रेंजशिवाय शूटींग आकाश नेवे, ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. ४ -  दोन आंतरराष्ट्रीय नेमबाज, ७० ते ८० राष्ट्रीय खेळाडू आणि पाच हजारांच्या वर इतर खेळाडू घडले, ते ही शूटिंग रेंजशिवाय. ही कामगिरी जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनने करून दाखवली आहे. या खेळाला जळगावात सुरू होऊन ३० वर्षे झालेली असली तरी अजूनही खेळाडू खुल्या जागेत गोंधळ, गोंगाटातच सराव करतात.जिल्ह्यातील नेमबाजांचा वनवास आज ३० वर्षांनंतरही कायम आहे. संघटनेच्या स्थापनेला ३० वर्षे झालेली असली तर शासनाने अजून जिल्ह्यात शूटिंग रेंज उपलब्ध करून दिलेली नाही. या बिकट परिस्थितीत संघटनेचे सचिव आणि प्रशिक्षक दिलीप गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्ग काढत दोन आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच ५०० च्या वर राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत.१९८६-८७ च्या सुमारास जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनची स्थापना केली. राज्यभरात तोपर्यंत मुंबई आणि कोल्हापूर येथेच या खेळाच्या अधिकृत संघटना कार्यरत होत्या. जळगावात स्थापन झालेली ही तिसरीच संघटना. त्या वेळी मेहरूण शिवारातील शिवाजी उद्यानात खुल्या जागेत नेमबाजीचा सराव केला जात होता. त्यानंतर महापालिकेच्या शाळेत सराव केला जात होता. कालांतराने गणपतीनगरात पायोनियर स्पोर्ट्स क्लबने नेमबाजांना सरावासाठी जागा उपलब्ध करून दिली.नेमबाजीचा सराव हा बंदिस्त जागेत केला जातो. मात्र, जळगावात आजही सराव खुल्या जागेत केला जातो. हा सराव करताना आवाज, गोंगाट होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. मात्र, बंदिस्त जागेअभावी अशी कोणतीही सुविधा खेळाडूंना उपलब्ध करून दिली जात नाही. आपण मारलेले शॉट हे योग्य जागी लागलेले आहेत की नाही, हे पाहण्यासाठी सध्या इलेक्ट्रॉनिक पुली किंवा अत्याधुनिक यंत्रांचा वापर केला जातो. त्याचद्वारे खेळाडूचे गुणही मोजले जातात. मात्र, जळगाव जिल्हा संघटनेकडे यासाठी अत्याधुनिक यंत्रणा नाही. जिल्हा संघटनेकडे फक्त पूर्वीच्या काळी वापरली जात होती, तशीच पुली आहे.त्यामुळे खेळाडूंना आपले गुण किती आहेत, हे नेमके कळत नाही. सराव जुन्या पद्धतीच्या साहित्यावर होत असला तरी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धा मात्र अत्याधुनिक साहित्यावरच होतात. त्यामुळे ऐन स्पर्धेत खेळाडूंना याचा फटका बसतो.रायफल असोसिएशनकडे जागेची वानवा असल्याने आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्पर्धेच्या सरावासाठी एका साहित्य ठेवायच्या चिंचोळ््या खोलीतच दोन नेमबाज सराव करू शकतील, अशी रेंज सुरू केली आहे. याला पत्र्याचे छप्पर असल्याने पावसात पत्र्याच्या आवाजाने आणि उन्हाळ््यात उष्णतेमुळे ही रेंज वापरण्याच्या योग्य राहत नाही. त्याशिवाय बाजूलाच इतर खेळांचा सराव होत असतो. त्यामुळे नेमबाजाच्या कामगिरीवर आवाजाचा परिणामही होतो. याच खोलीच्या पुढे मोकळ््या जागेत इतर खेळाडू सराव करतात. स्पर्धांमध्ये ५० मीटरवर खेळणारे खेळाडू सराव मात्र दहा मीटरवरच करतात. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो. असे असले तरी जिल्ह्यातील नेमबाजांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत.