शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या सुरक्षा एजन्सीची बांधकाम विभागाच्या कामाबाबत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST

आनंद सुरवाडे जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात फायर ऑडिट वेळोवेळी होणे गरजेच असून, हे काम वेगाने व ...

आनंद सुरवाडे

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात फायर ऑडिट वेळोवेळी होणे गरजेच असून, हे काम वेगाने व पारदर्शक होणे अपेक्षित असल्याचे सांगत राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी, मुंबईचे सहायक संचालक संजय पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. ते प्रशिक्षणासाठी जीएमसीत आले होते. रुग्णालयात लागणाऱ्या आगीवर प्रतिबंधक उपाययोजना तातडीने करता याव्यात याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षा प्रतिबंधक प्रशिक्षण विभाग देण्यात आले.

राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी, मुंबईचे सहायक संचालक संजय पाटील, तज्ज्ञ सदस्य विक्रम देसाई यांनी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे मंचावर उपस्थित होते. आग रोखण्यासाठी मॅन्युअल फायर अलार्म प्रणाली कार्यान्वित ठेवली पाहिजे. त्यासह अग्निशमन दलाला कळवून आपल्या कर्मचारी वर्गाला धीर देऊन योग्य सूचना करीत आग प्रतिबंधक उपकरणांचा वापर केला पाहिजे. वेळोवेळी फायर ऑडिट करून घ्यावे, अशी माहिती त्यांनी दिली.

सा. बां. विद्युत विभागाकडे अपूर्ण माहिती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवार व शुक्रवारी फायर ऑडिट करण्यात आले. आलेल्या टीमने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काही कागदपत्रे व तांत्रिक माहिती मागितली. मात्र, त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्रे किंवा माहिती उपलब्ध नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे या ऑडिटमध्ये अडचणी आल्या. आता एक ते दीड महिन्यांनी याचा अहवाल येणार असून, त्यानंतर त्रुटी दूर करण्यात येणार आहेत.

दुर्लक्ष का?

काही रुग्णालयांत आगी लागल्याच्या घटना मध्यंतरी समोर आल्या होत्या. त्यावेळी फायर ऑडिटचा मुद्दाही ऐरणीवर आला होता. जीएमसीत यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, याची मुख्य जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होतेय का ? असा एक प्रश्न समोर आला आहे. वेळोवेळी हे ऑडिट होणे गरजेचे आहे. यासाठी जीएमसीत स्वतंत्र समिती असून, तांत्रिक बाबी या बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाची जबाबदारी आहे, असे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबईच्या अधिकाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केल्याने बांधकाम विभागाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.