शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताई पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

By admin | Updated: May 28, 2017 17:24 IST

मुक्ताईनगर : उद्या प्रस्थान, सजावट पूर्ण

ऑनलाईन लोकमत

मुक्ताईनगर,दि.28 - 308 वर्षाची अखंड परंपरा असलेली व 700 कि.मी. अंतराचा प्रवास असलेली श्री क्षेत्र कोथळी स्थित श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याची जय्यत तयारी पूर्णत्वाकडे आली आह़े राज्यातील विविध भागातून पालखी सोहळ्यासाठी वारक:यांचे शहरात आगमन होण्यास सुरुवात झाली आह़े 
गेल्या 308 वर्षापासून कोथळी, ता.मुक्ताईनगर येथून आदिशक्ती मुक्ताबाई समाधीस्थळ ते पंढरपूर अशी आषाढी वारीसाठीची परंपरा आहे. या वर्षी मंगळवारी म्हणजेच 30 तारखेला पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत असून पालखी सोहळ्याची जय्यत तयारी तसेच रथाची सजावट पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्रात वैभवशाली  परंपरा लाभलेल्या वारकरी  पंथाचे आराध्य दैवत भगवान  पांडूरंगाचे दर्शनाला  पायी जाण्याची  शेकडो वर्षाची परंपरा आजही टिकून आहे. राज्यातून वा परराज्यातून वारकरी  संताचे दिंडी-पालखी  सोहळे आषाढी-कार्तिकीस लाखो वारक:यांसह शेकडो दिंडय़ा पालख्या पंढरीत दाखल  होतात. त्यात  प्रमुख  मानाच्या  सात पालखी असून  संत ज्ञानेश्वर,  संत तुकाराम, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ,संत सोपानदेव, संत  मुक्ताबाई, संत नामदेव या संतांच्या  पालख्यांचा  समावेश आहे. वाखरीतून पंढरीत  प्रवेश  ह्याच क्रमाने  होतो़ त्यातीलच सर्वात  लांब अंतराची आई मुक्ताईची पालखी  श्री  क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथून 30 मे 2017 मंगळवारी सकाळी 10 वाजता प्रस्थान करीत आहे. 308 वर्षाची  अखंड  परंपरा जोपासत  700 किमीचा 34 दिवसांचा  प्रवास  करीत  मलकापूर,  बुलढाणा,  चिखली,  देऊळगावराजा, जालना , गेवराई, बीड,  भूम,  माढा, आष्टी मार्गाने 1 जुलै रोजी पंढरीत दाखल  होईल.