शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा थकबाकीदारांना ` शॉक `

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST

जळगाव : कोरोनामुळे अनेक ग्राहकांनी विजबिल भरण्याकडे पाठ फिरवली असून, परिणामी खान्देशात ६०० कोटींच्या घरात थकबाकी पोहचली आहे. ग्राहकांनी ...

जळगाव : कोरोनामुळे अनेक ग्राहकांनी विजबिल भरण्याकडे पाठ फिरवली असून, परिणामी खान्देशात ६०० कोटींच्या घरात थकबाकी पोहचली आहे. ग्राहकांनी थकबाकी भरण्याबाबत महावितरणने आक्रमक भूमिका घेतली असून,जळगावसह धुळे व नंदुरबार मिळून १ हजार ७६२ थकबाकीदारांना बिल भरण्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत. तसेच दिलेल्या मुदतीत बिलाचा भरणा न केल्यास, अशा थकबाकीदारांचा थेट विज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने महावितरणतर्फे शासनाच्या आदेशानुसार घरोघरी जाऊन रिडींग न घेता, ग्राहकांना सरासरी बिले देण्यात आली. मात्र, देण्यात आलेली सरासरी बिले ही जादा असल्याच्या अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या. ग्राहकांच्या या तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणने जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी शिबिरे घेतली.

यामध्ये अनेक ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येऊन, विजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ग्राहकांना हफ्त्यानेही बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

मात्र, तरीदेखील खान्देशातील घरगुती, औद्योगिक, कृषी, लघु आदी ग्राहकांनी मार्च २०२० पासून विजबिल भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस थकबाकीदारांची संख्या वाढत असून, वसुलीसाठी महावितरणपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

इन्फो :

कृषी पंपधारक ग्राहकांना वगळले

महावितरणच्या जळगाव परिमंडळात घरगुती, कृषी, औद्योगिक, वाणिज्य व इतर असे एकूण २२ लाखांच्या घरात ग्राहक आहेत. यामध्ये साडेतीन लाख ग्राहक हे कृषी पंप धारक शेतकरी आहेत. शासनाच्या सुचनेनुसार या कृषी पंपधारक शेतकऱ्यांना थकबाकी भरण्याबाबत कुठलीही नोटीस पाठविण्यात आलेली नाही.

इन्फो :

कोरोनामुळे कारवाई लांबली

शासनाने लॉकडाऊन कालावधीत घरोघरी जाऊन रिडींग न घेता, ग्राहकांना सरासरी विजबिले देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महावितरणतर्फे सरासरी बिले देण्यात आली. तसेच शासनातर्फे कोरोना काळात थकबाकीदार ग्राहकांकडुन कुठलीही वसुली अथवा कारवाई न करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यामुळे महावितरणतर्फे कोरोनामुळे थकबाकीदारांविरोधात कुठलिही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, शासनाने नुकतेच हे निर्बध उठविल्यामुळे, महावितरणतर्फे थकबाकीदारांना नोटीसा पाठवून, कारवाईचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.

इन्फो :

महावितरणतर्फे जास्त क्षमतेच्या विज वापर असलेल्या थकबाकीदार ग्राहकांना बिल भरण्याबबात नोटीस बजावण्यात येत असून, आतापर्यंत १ हजार ७६२ ग्राहकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांची संख्या मोठी असल्यामुळे महावितरणतर्फे शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक वायरमनला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. कोरोनामुळे थांबलेली वसुलीची मोहिम आता सुरू करण्यात आली आहे.

दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, महावितरण जळगाव परिमंडळ.