जळगाव : जळगाव विमानतळावरून अहमदाबाद, मुंबई विमानसेवेनंतर लवकरच पुणे व इंदूरची सेवा सुरु होणार आहे. यासाठी खासदार उन्मेश द पाटील यांनी दिल्लीत येथे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिपसिंग पुरी यांची भेट घेतली असून, त्यांनीही या सेवेबाबत सकारात्मकता दाखविली आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जळगाव विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास आराखडा तयार केला आहे.यातील विविध अडथळे, विवीध प्रकारच्या अडचणी मार्गी लावण्याकरीता उन्मेश पाटील यांनी हरदिपसिंग पुरी यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी उन्मेश पाटील यांनी जळगाव विमान तळावर महत्वाची नाईट लँडिंगची सुविधा झाल्यामुळे या ठिकाणाहून पुणे व इंदूरची सेवा सुरु करण्याची मागणी केली.
यावेळी झालेल्या हरदिपसिंग पूरी यांनी या नविन विमानसेवेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे ही नविन विमानसेवा लवकरच सूरू होणार आहे. यावेळी भारतीय विमान प्राधिकरण सहसचिव उषा पाडी, नियोजन सदस्य अनिल पाठक उपस्थित होते.
इन्फो :
उड्डाण मंत्र्यांच्या संबंधित विभागाला सूचना
या भेटीनंतर मंत्र्यांनी पुणे विमानतळ हे संरक्षण विभागाच्या ताब्यात असून, विमानतळ प्राधिकरणाने जळगाव विमानतळावरून पुणे विमान सेवा सूरू करण्यासाठी पुणे येथे स्लॉट मिळावा याकरिता विशेष प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या. तसेच इंडिगो आणि एअर अलायन्स खाजगी आणि सरकारी विमान कंपनी यांचेशी चर्चा करण्याचेही सांगितले.