शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मातेनेच दिली कष्टाची शिकवण

By admin | Updated: May 14, 2017 16:51 IST

गेल्या 65 वर्षे मी आणि सर्व भावंडे तिच्या सावलीत आहोत़ तिने आमचे संगोपन जगातल्या इतर आईंप्रमाणेच जिव्हाळ्याने केल़े

सुनील साळुंखे / ऑनलाइन लोकमतशिरपूर, जि. धुळे, दि. 14 - मातृदिनाची संकल्पना पाश्चात्य आह़े मात्र आपल्याकडे रोजच ‘मातृदिन’ असतो़ मातृभावना ही वैश्विक भावना आह़े माझी आई हेमंतबेन पटेल आज 85 वर्षाच्या आहेत़ गेल्या 65 वर्षे मी आणि सर्व भावंडे तिच्या सावलीत आहोत़ तिने आमचे संगोपन जगातल्या इतर आईंप्रमाणेच जिव्हाळ्याने केल़ेकामानिमित्त मी बाहेरगावी असलो तरी रोज रात्री आई आस्थेने विचारते, ‘बेटा खाना हो गया?’ मी हो म्हटले की तिचे पोट भरत़े आईजवळ असलो की आग्रहाने आजही सूनांना सांगून खाऊ घालत़ेआमच्यावर बालपणापासूनच तिने चारित्र्याचे संस्कार केले आहेत़ नीतीचे धडे दिले आहेत़ प्रतिकूलतेतही मनाचा संयम सोडायचा नाही़ कठोर परिश्रमाशिवाय या जगात काहीच मिळत नाही़ एखादे अपयश हे तात्पुरते असू शकत़े प्रयत्न थांबवायचे नसतात़ अत्यंत मृदु असलेले पाणी सततच्या परिश्रमाने एक दिवस खडकही फोडतेच़ हे आईने सांगितलेले तत्त्वज्ञान मला आजही धीर देत़े मी यशाप्रसंगीही आईची मूर्ती डोळ्यासमोर आणतो, तसेच एखादे कार्य मनासारखे झाले नाही, त्यावेळीही आईचीच मूर्ती डोळ्यासमोर आणतो़ त्यामुळे माझी मरगळ दूर होत़े आम्हा सर्वच भावंडांसाठी ती चैतन्याचा स्त्रोत आह़ेआज पटेल कुटुंबाचा जो काही आलेख असेल त्यात माङया ‘बा’ चा सिंहाचा वाटा आह़े परिश्रम, जिद्द, चिकाटी, नीतिमत्ता यांचे बाळकडू तिने पाजले नसते तर कुटुंबाची आजची ‘विकासगाथा’ साकारली नसती़ आई-वडीलात जसा आम्ही आमचा देव पाहिला तशीच आमची पुढची पिढी देखील आचरण करीत आह़ेआई राजकारणात नाही, पण समाजकारणात आह़े शिरपुरातल्या सामाजिक व धार्मिक कार्यात तिला सहभागी होण्यास आनंद वाटतो़ कार्यक्रमातून परतल्यानंतर आज तेथे काय-काय झाले ते फोनवरून सांगत़े आजही ती बालाजी मंदिरात दर्शनासाठी नियमित जात़े त्यामुळे कामानिमित्त बाहेरगावी असलो तरी आईजवळच असल्याचा आनंद मिळतो़सण, उत्सव, वाढदिवस, पुण्यस्मरणनिमित्त सर्व पटेल कुटुंब एकत्र येते, तेव्हा आईला भरलेला संसार पाहून आनंद वाटतो़ तिचे नातवांवरही तितकेच प्रेम आह़े पंतवंडे तर तिच्या अंगावरच खेळतात़ संपूर्ण कुटुंबाचा सुत्रधार आज मी असलो तरी माझा सुत्रधार माझी आईच आह़े आईची इच्छाशक्ती मजबूत आहे, देव तिला दीर्घायु. आरोग्य देवो़ आईबद्दल खूप बोलता येईल, तरी ते पूर्ण झाले असे वाटणार नाही़ तिची अजून खूप सेवा करायला मिळावी, ही इच्छा आई़ मातृदिनानिमित्त आईला शिरसाष्टांग नमस्काऱ