शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

आईकडूनच मिळाले परिश्रमाचे बाळकडू

By admin | Updated: May 14, 2017 11:45 IST

परिश्रमाचे हे बाळकडू मला लहानपणी आईकडूनच मिळाले,

विजयकुमार सैतवाल / ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 14 - माझी नोकरी, कार्य  म्हणजे सेवेचा भाग आणि यासाठी आवश्यक असतात ते परिश्रम. परिश्रमाचे हे बाळकडू मला लहानपणी आईकडूनच मिळाले, अशी भावना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील भामरे यांनी व्यक्त केली. मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना  डॉ. भामरे म्हणाले की, एका सामान्य कुटुंबात जन्म झाल्यानंतरही केवळ आईचे आशीर्वाद, शिकवण, संस्कार यामुळे मी चांगले शिक्षण घेऊन ही ङोप घेऊ शकलो. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे जन्म झाल्यानंतर आईने मोठय़ा लाडात वाढविले. या लाडासोबत आईच्या बालसंस्काराची किनारही त्याला होती.  पुढे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण सटाणा, जि. नाशिक येथे झाल्यानंतर पुण्याला वैद्यकीय शिक्षणासाठी गेलो. त्या वेळी आईला मोठी काळजी होती, असे आवजरून डॉ. भामरे यांनी सांगितले.  आईने सदैव एक शिकवण दिली ती म्हणजे, साधे रहा, नेहमी मदत करावी, कोणाचे नुकसान अथवा वाईट करू नये, सेवा ही महत्त्वाची आहे. आईच्या या शिकवणीमुळेच मी जिल्हा शल्य चिकित्सक असलो तरी रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य देत असतो, असे डॉ. भामरे यांनी सांगितले.  आईच्या शिकवणीमुळे संस्कारीवृती जपण्याकडे लक्ष देत असल्याचे डॉ. भामरे म्हणाले.