शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आई गावाला, वडील ड्युटीला घरात मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST

फोटो... जळगाव : आई व भाऊ गावाला तर वडील रात्रपाळीच्या ड्युटीला असताना रितेश गुलाबराव मोरे (वय १७) या अल्पवयीन ...

फोटो...

जळगाव : आई व भाऊ गावाला तर वडील रात्रपाळीच्या ड्युटीला असताना रितेश गुलाबराव मोरे (वय १७) या अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी हरिविठ्ठल नगरात घडली. रितेश याच्या आत्महत्येचे कारण अजून तरी समजलेले नाही, मात्र लाॅक असलेल्या मोबाईलमधूनच काही तरी धागेदोरे मिळतील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश हा पाण्याचे जार वाटप करण्याचे काम करायचा. शहरातील एका महाविद्यालयतही त्याने प्रवेश घेतला होता. वडील गुलाबराव सुकलाल मोरे एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. शुक्रवारी त्याची आई व भाऊ असे दोघेजण धुळे येथे नातेवाईकांकडे गेले होते. तर वडील रात्रपाळीसाठी ड्युटीवर गेले होते. शुक्रवारी रात्री रितेश हा एकटाच घरी होता. त्याने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी सात वाजता वडील गुलाबराव मोरे हे ड्युटीवरुन घरी आले तेंव्हा रितेश आतून काहीच प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शेजारी राहणाऱ्यांना बोलावुन घेत घराचा दरवाजा तोडला असता रितेश गळफास घेतलेल्या स्थितीत आढळुन आला. ही घटना पाहून वडील गुलाबराव मोरे यांना जबर धक्का बसला.

दरम्यान, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे प्रवीण जगदाळे व मनोज वानखेडे यांनी नागरिकांच्या मदती रितेश याला खाली उतरवुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी दोन वाजता पिंपळकोळा (ता. एरंडोल) या मुळ गावी रितेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत रितेश याच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित बहिण व लहान भाऊ आकाश असा परिवार आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाईलचा लाॅक उघडेना

दरम्यान या घटनेनंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच रितेश याने काही सुसाईड नोट लिहिली आहे का? यासाठी त्याचे खिसे तसेच इतर ठिकाणी तपासणी केली मात्र तसं काहीच मिळाले नाही. मोबाईल आढळून आला मात्र तो लाॅक होता, तो उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यात अपयश आले. या मोबाईलमधूनच धागेदोरे मिळतील अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.