शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आईने स्वत:च्या हिंमतीवर जगायला शिकविले

By admin | Updated: May 14, 2017 12:20 IST

आई सरोजनी हिच्या शिकविणीमुळे आज या पदार्पयत पोहचल्याचे महावितरण कंपनीचे जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी सांगितले

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 14 - आई माझा गुरू, आईच कल्पतरू याप्रमाणे मला घडविण्यात माङया आईचा खूप मोठा आह़े कुणाच्या उपकाराखाली न राहता, प्रामाणिकपणे मेहनत करून स्वत:च्या पायावर उभे रहा या आई सरोजनी हिच्या शिकविणीमुळे आज या पदार्पयत पोहचल्याचे महावितरण कंपनीचे जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी सांगितले. मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना  ते म्हणाले की, आई-वडील तीन भाऊ व दोन बहिणी असा परिवार होता़ आई व वडील दोघे शिक्षक़  सामान्य कुटुंबात वाढलो़ आई शिक्षिका असल्याने आमच्या शिक्षणाच्या बाबतीही तिने कुठेही तडतोड केली नाही़ बहिणीचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाला़ यावेळी मी दहावीत होतो़ पॉलिटेकिAनसाठी मला सोलापूर येथे प्रवेश मिळाला होता़ सर्व कुटूंब दु:खात होत़े  आईवर तर दु:खाचा डोंगर कोसळलेला होता़ अशात दु:ख विसरुन ती एकटी मला सोलापूर येथे सोडायला आली़ व पुन्हा गावाकडे परतली़ आई पासून दूर राहण्याचा पहिलाच अनुभव होता़ त्यामुळे आईला सोडताना रडू कोसळले होत़े अशी आठवणही जनवीर सांगतात़ वडीलांचा कॅन्सरने मृत्यू झाला़ यावेळी तिने स्वत:ला सावरत कधी वडीलांची आठवण येवू दिली नाही़  आईचे वय 77 वर्षे आह़े प्रत्येकाकडे जात़े नातवंडेही मोठय़ा पदावर असल्याचा तिला अभिमान वाटतो़ आयुष्यात थोडा त्रास होईल मात्र लाचारी पत्करू नका, हिंमतीने जगा ही तिची शिकवण आजही मनात कायम आह़े