शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाणे येथे 500 पेक्षा अधिक मतदारांचा बहिष्कार

By admin | Updated: February 17, 2017 01:11 IST

मतदार यादीमध्ये अनुक्रम नंबर अनेक याद्यांमध्ये शोधूनही न सापडल्याने 500 पेक्षा अधिक मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

जळगाव : आव्हाणे ता.जळगाव येथे मतदार यादीमध्ये अनुक्रम नंबर अनेक याद्यांमध्ये शोधूनही न सापडल्याने जवळपास 500 पेक्षा अधिक मतदारांनी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करून मतदानावर बहिष्कार टाकला. याप्रकारामुळे आव्हाणे गावात तणाव निर्माण झाला होता. तर आसोदा ता.जळगाव येथे मतदान यंत्रात मतदान करताना कुठल्याही उमेदवारासमोरील बटन दाबले तरी फक्त शिवसेनेलाच मतदान होत होते, अशी तक्रार जि.प.गटाच्या उमेदवार रुपाली भोळे यांनी केली. पण या तक्रारीमध्ये कुठलेही तथ्य चौकशीअंती आढळले नसल्याचा निर्वाळा तहसीलदार यांनी केला आहे. उजाड कुसुंबा येथे शिरसोली चिंचोली गटातील जि.प. उमेदावारांच्या दोन गटांमध्ये वाद झाला. हे आहे याद्यांमधील घोळाचे कारणतहसील प्रशासनाने मतदानाबाबत गट व गणनिहाय याद्यांनुसार नियोजन केले. याच नियोजनानुसार गट व गणनिहाय याद्या उमेदवारांना देण्यात आल्या. पण नंतर म्हणजेच मागील सोमवारी मतदान केंद्रनिहाय याद्या निवडणूक आयोगाने पाठविल्या. या याद्यांनुसार मतदानाची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना आल्या. परंतु सोमवारपर्यंत सर्वच उमेदवारांनी गट व गणनिहाय मतदार याद्यांनुसार आपल्या मतदार स्लीप तयार केल्या व त्यांचे वितरणही केले. या स्लीपमधील मतदाराचा अनुक्रम नंबर व जुन्या गट व गणनिहाय यादीमधील अनुक्रम नंबर यात तफावत आढळली. त्यामुळे नव्या यादीमध्ये अनेक मतदारांचे अनुक्रम नंबर आढळले नाहीत. यादीत नाव होते, पण अनुक्रम नंबरचा घोळ झाल्याने शोधाशोध करावी लागली. यादी शोधण्यातच तास, दोन तास गेल्याने अनेक मतदारांना मन:स्ताप सहन करावा लागला. अशातच आव्हाणे ता.जळगाव येथे जवळपास 500 मतदारांनी मतदान न करताच केंद्र सोडले. यातच मतदान केंद्रात काही वेळ तणाव निर्माण झाला. लागलीच तहसीलदार यांना बोलावण्यात आले.तहसीलदार अमोल निकम यांनी केंद्राला भेट दिली व यादीमध्ये कसा बदल झाला.., अनुक्रम नंबर मतदान केंद्रनिहाय यादीनुसार घेऊन ही प्रक्रिया राबविली जात असल्याचे स्पष्ट केले. नंतर अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात पोलिसांचा अतिरिक्त ताफाही पाठविण्यात आला. आसोदा येथे मतदान यंत्राबाबत तक्रारआसोदा ता.जळगाव येथे मतदान केंद्र क्रमांक 28 मधील यंत्रात कुठलेही बटन दाबले तरी फक्त शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान होत असल्याची तक्रार भाजपाच्या उमेदवार रुपाली भोळे यांनी केली. तहसीलदार यांना याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर तहसीलदार यांनी मतदान यंत्राची तपासणी केली. मतदान केलेल्या 10 व्यक्तींकडून माहिती घेतली.. मतदान केंद्राध्यक्षांना विचारणा केली. त्यात या मतदानकेंद्रात कुठलाही घोळ आढळलानाही, असे तहसीलदार निकम यांनी सांगितले.तालुक्यातील 181 मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान झाले. मतदान केंद्रानिहाय नवीन यादी आल्याबाबत उमेदवारांना सूचना दिल्या. कुठेही मोठे वाद झाले नाहीत. मतदान यंत्रात बिघाडही झाले नाही.       -जलज शर्मा,         निवडणूक निर्णय अधिकारी