शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘आमदार आपल्या गावी’ उपक्रमास भडगाव तालुक्यात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST

ग्रामपंचायतीच्या विकास कामांसह समस्या, तक्रारींचा आढावा बैठकीत घेतला. ग्रामपंचायतींमार्फत विविध विकासकामांची मागणी आमदारांकडे करण्यात आली. आमदारांनीही यापूर्वी गावा ...

ग्रामपंचायतीच्या विकास कामांसह समस्या, तक्रारींचा आढावा बैठकीत घेतला. ग्रामपंचायतींमार्फत विविध विकासकामांची मागणी आमदारांकडे करण्यात आली. आमदारांनीही यापूर्वी गावा गावात केलेल्या आमदार निधीतून, शासकीय निधीतून केलेल्या विविध विकासकामांचेही वाचन केले. ग्रामस्थांनी वीज समस्या, रेशन, घरकुल, पीक विमा यासह विविध समस्या व तक्रारींचा पाढा वाचला. आमदार पाटील यांनी आलेल्या समस्या, तक्रारी समजून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून तत्काळ प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.

‘आमदार आपल्या गावी’ या अभियानातून ग्रामपंचायतींच्या कामांचा आढावा, समस्या जाणून त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी ही संकल्पना राबविल्याचेही या आढावा बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. तसेच आता महाराजस्व अभियानअंतर्गत पंचायत समिती गणनिहाय शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रम सुरू होणार आहेत. त्यावेळी वैयक्तिक लाभासह शासकीय योजना, रेशन, घरकुल यासह समस्या अडचणी नागरिकांनी मांडाव्यात, समस्या सोडविल्या जातील, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले.

या बैठकींना आमदार किशोर पाटील, सभापती डाॅ. अर्चना पाटील, तहसीलदार सागर ढवळे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय लकवाल, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, जि. प. सदस्या कीर्ती चित्ते, संजय पाटील बात्सर, जय मातादी ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ. विशाल पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जे. के. पाटील, शिवसेना तालुका प्रमुख डाॅ. विलास पाटील, बाजार समिती प्रशासक संचालक युवराज पाटील, राहुल पाटील गोंडगाव, योगेश सूर्यवंशी गोंडगाव, योगेश पाटील बात्सर, जालिंदर चित्ते, विस्तार अधिकारी टी. पी. मोरे, सांख्यिकी अधिकारी धनसिंग राजपूत, बचत गट उमेदचे प्रशांत महाले, घरकुल निर्माण अधिकारी रोशन पाटील, महावितरणचे राऊत, पाचोरा ग्रामीण पुरवठा विभागाचे अभियंता डी. बी. राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सूचिता आकडे, आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत पाटील, बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेंद्र आखाडे, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता पी. टी पाटील, मंडळ अधिकारी आर. पी. शेजवळकर, वाडे तलाठी रत्नदीप माने, बालविकास प्रकल्प विभाग पर्यवेक्षिका सुजाता चौधरी, कृषी सहायक सचिन पाटील उपस्थित होते.

वाडे येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. विशाल पाटील, अशोक परदेशी यांनी केले. सूत्रसंचलन परशुराम माळी यांनी केले. यावेळी सरपंच रजूताई पाटील, उपसरपंच प्रदीप भिल्ल व सर्व ग्रामपंचायत सदस्य, दिनकरराव पाटील, आधार माळी, देवीदास माळी, श्यामसिंग परदेशी, कर्मचारी हजर होते.