शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST

संतापजनक घटना : तिघांविरोधात गुन्हा भुसावळ : शहरात आईच्या नात्यात असलेल्या जवळच्या नातेवाईक महिलेकडे शिक्षणासाठी आलेल्या ...

संतापजनक घटना : तिघांविरोधात गुन्हा

भुसावळ : शहरात आईच्या नात्यात असलेल्या जवळच्या नातेवाईक महिलेकडे शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा नातेवाईक महिलेच्या पतीने विनयभंग केला. ही बाब या महिलेला सांगितली असता तिने दुर्लक्ष केले. यामुळे ही पीडिता अन्य जवळच्या नातेवाइकाकडे आली; मात्र तेथे त्यानेच तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी या तिघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील एका गावातील १६ वर्षीय ही मुलगी शिक्षणासाठी आपल्या जवळच्या नातेवाईक महिलेकडे आली असता तिच्यावर या महिलेचा पती संतोष लागीर गिरी (५३) याने विनयभंग केला. ही बाब मावशीला सांगितल्यानंतर त्यांनी दुर्लक्ष करीत बालिकेला अन्य जवळचे नातेवाईक संतोष वामनराव भारती (३४) याच्याकडे पाठविले. मात्र संतोष भारती याने या मुलीवर तब्बल सात महिने अत्याचार केले. पीडितेने ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. शेवटी अत्याचाराला कंटाळून गुरुवारी पीडितेने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून कैफियत मांडल्यानंतर संतोष लागीर गिरी (५३), संतोष वामनराव भारती (३४) व प्रमिला संतोष गिरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष गिरी व संतोष भारती यांना अटक करण्यात आली. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सुभाष साबळे करीत आहेत. हे नातेवाईक अगदी जवळचे असूनही मुलगी ही या आरोपींच्या मुलीसारखीच आहे, तर माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे शहरातून अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

दरम्यान याप्रकरणी घटनेतील आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.