शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

इव्हेंट साधून लाखोंची उलाढाल

By admin | Updated: January 1, 2016 00:02 IST

. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे 31 डिसेंबरसाठी तब्बल एक लाख एकदिवसीय दारू पिण्याचे वैयक्तिक परवाने वाटप करण्यात आले होते.

नंदुरबार : नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण होते. सायंकाळनंतर ठिकठिकाणी विविध उपक्रमांना सुरुवात झाली होती. सार्वजनिक इमारती आणि खासगी हॉटेल्स यांच्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे 31 डिसेंबरसाठी तब्बल एक लाख एकदिवसीय दारू पिण्याचे वैयक्तिक परवाने वाटप करण्यात आले होते. त्यातून जवळपास पाच लाखांचा महसूल विभागाला मिळाला. दरम्यान, मद्य पिऊन आणि भरधाव वाहन चालविणा:यांवर पोलिसांनी विविध माध्यमातून नजर ठेवली होती.

नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणावर मद्य व मांस रिचवले जाते. त्यासाठी अनेक ठिकाणी जेवणावळी, ओल्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

नववर्षाच्या स्वागतासाठी काहींनी विधायक उपक्रम आयोजित केले होते. तर काहींनी नेहमीप्रमाणे पाटर्य़ाचे आयोजन केले आहे. त्यासाठी हॉटेल्स, ढाबे, फार्म हाऊस आणि शेतांमधील मळ्यांमध्ये सोय करण्यात आली होती.

हा इव्हेंट साध्य करण्यासाठी हॉटेल्स व ढाबेमालकांनीदेखील विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. अनेक ठिकाणी साग्रसंगीत अर्थात ऑर्केस्ट्रासह भोजनाची मेजवानी देण्याचा प्रय} करण्यात आला तर काही ठिकाणी डीजेची धूम सुरू होती. काहींनी विशिष्ट बिलांवर गिफ्ट किंवा सवलत देण्याची योजना लागू केली होती. काहींनी खास फॅमिलींसाठी सोय केली.

मद्य विक्रीचेदेखील उत्पादन शुल्क विभागाने उद्दिष्ट ठरवून घेतले होते. त्यासाठी बनावट मद्यावर नजर ठेवण्यात आली. त्याचअंतर्गत शहादा येथे 35 लाखांच्या मद्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्यात मध्य प्रदेशातून मोठय़ा प्रमाणावर बनावट मद्य येत असते. शिवाय गुजरातमध्ये मद्यावर बंदी असल्यामुळे जिल्ह्याच्या हद्दीतून अवैध मद्याचीही मोठय़ा प्रमाणावर वाहतूक केली जाते. त्यामुळे अशा वाहतुकीवर व विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष नजर ठेवली होती.

मद्य पिणा:यांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाने देण्याची सोय केली होती. काहींकडे आजीवन तर काहींकडे वर्षभराच्या कालावधीचे परवाने असतात. अशा परवानाव्यतिरिक्त एक दिवसीय परवान्यांचेदेखील वितरण केले गेले. जवळपास एक लाख परवाने देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

मांस विक्री

31 डिसेंबरसाठी मांस विक्रेत्यांनी दोन दिवस आधीपासूनच नियोजन करून ठेवले होते. गावरान कोंबडीचे भाव किलोला 260 ते 300 रुपये होते. बोकडच्या किंमतीदेखील 200 ते 300 रुपयांनी वाढल्याचे सांगण्यात आले. नेहमीपेक्षा तिप्पट ते चौपट पटीने मांस विक्री झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.