शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

लाखोची बनावट दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2017 00:34 IST

उत्पादन शुल्कची कारवाई : 15 कि.मी.र्पयत केला पाठलाग

जळगाव : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर 1 लाख रुपये किमतीची बनावट दारु व अडीच लाख रुपये किमतीची कार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुधवारी सकाळी इदगाव शिवारात पकडली. या कारचा पथकाने तब्बल पंधरा किलोमीटर्पयत पाठलाग केला. शिरपूर येथून वाशिम येथे ही दारु नेण्यात येत होती.अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत बनावट दारुचा मोठय़ा प्रमाणात वापर झाला, त्यामुळे मंगळवारी तेथे चार जणांचा बळी गेला. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर विभागीय उपायुक्त पी.पी.सुर्वे यांनी विभागातील सर्व अधीक्षकांना बनावट दारुविरुध्द मोहीम राबविण्याचे आदेश दिले. तसेच जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनीही जळगावचे अधीक्षक एस.एल.आढाव यांना बनावट दारुवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. आढाव व विभागीय निरीक्षक सी.पी.निकम यांना शिरपूर येथे निर्मित झालेली बनावट दारु निवडणुकीसाठी जळगावमार्गे विदर्भात जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार निकम यांनी सहायक दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, भूषण वाणी, संतोष निकम व मुकेश पाटील या सहका:यांना सोबत घेवून चोपडय़ाजवळ सापळा लावला होता. विदेशी दारुच्या 624 बाटल्याया कारची तपासणी केली असता त्यात विदेशी दारुच्या 180 मिली.च्या 624 बाटल्या आढळून आल्या. त्याची किंमत 78 हजार रुपये आहे. कारचालक आशिष मिलनकुमार चौकसे (वय 24 रा.कारंजा लाड, ता.जि.वाशिम) याला कारसह (क्र.एम.एच.09 ए.एल.6688) ताब्यात घेण्यात आले. कार चालकाने बदलविला मार्गकारवाईच्या भीतीने कार चालकाने कार धरणगावमार्गे न नेता धानोरामार्गे वळविली. मार्ग बदल केल्याचे समजताच पथकाने कारचा पाठलाग केला. पुढे त्याला पथकाची कुणकुण लागली. त्यामुळे त्याने भरधाव वेगाने कार पळवली. त्याचा पाठलाग करत असताना सकाळी साडे आठ वाजता इदगाव शिवारात या कारच्या पुढे पथकाने त्यांचे वाहन आडवे लावले. यातील आरोपीला दुस:यांदा जळगावात बनावट दारुसह पकडण्यात आले.