शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

माथेफिरु चढला इंधनाच्या मालगाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 11:14 IST

भुसावळ रेल्वे स्थानकावरील थरार

ठळक मुद्देगाड्यांना विलंब , तरुण मुंबई येथील रहिवासी

 भुसावळ : रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३-४ च्या मध्यभागी असलेल्या रेल्वे मार्गावर उभ्या असलेल्या आणि इंधनाने भरलेल्या मालगाडीच्या टँकरवर मुंबईतील माथेफिरु तरुण चढल्याने स्थानकावर रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. यामुळे काही प्रवासी गाड्यांना विलंब झाला.६ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता गोदान एक्सप्रेसने येथे आलेला संतोष कुमार ठाकूर (२८ रा. सागबाग, मरोल, अंधेरी, मुंबई, मूळ रा. मियापूर, पोस्ट शहागंज, उत्तर प्रदेश ) हा तरुण ‘वो लोग मुझे मार डालेंगे, एक के हात मे बंदूक है, मै अकेला हूँ, मुझे बचाओ असे जोरजोराने ओरडत ७ रोजी सकाळी अचानक पळत सुटला आणि फलाट क्रमांक ३ व ४ च्या मध्यभागी उभ्या असलेल्या मालगाडीच्या एका टँकरवर जाऊन बसला. हे दृश्य पाहताच स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली.संतोष ज्या टँकरवर चढला होता. त्यावरुन अतिउच्च दाबाची २४ हजार केव्हीच्या वाहिनीतून वीज प्रवाह सुरू होता. संतोष कुमार याचा त्याला स्पर्श झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. दरम्यान, रेल्वे सुरक्षा बलाने लागलीच वीज प्रवाह बंद केला.स्थानकावरील पोलीस निरीक्षक दिनेश नायर, सहाय्यक उपनिरीक्षक एस. एस. चाहर, एएसआय एम.आर राज, नावेद शेख या आरपीएफ कर्मचाऱ्यांनी ठाकूर याला उतरण्याची विनंती केली. तो एकच सांगत होता वो मुझे मार डालेंगे. नंतर हिंमत करून कॉ.नावेद शेख हे स्वत: टँकरवर चढले व सहकाºयांच्या मदतीने त्यास खाली उतरवण्यात आले.दरम्यान संतोष कुमार यास गुरुवारी रेल्वे न्यायालयात आणले असता रेल्वे कायदा १७४ (सी ),१४५ (बी)१४७ अन्वये त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दरम्यान, मुंबईकडे जाणाºया गीतांजली एक्सप्रेसच्या एका डब्याची बेअरिंग तुटल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. त्यामुळे गाडीचा काही वेळ खोळंबा झाला. नंतर दुसºया डब्याची व्यवस्था लावून गाडी पुढे रवाना करण्यात आली.सतर्क कर्मचाºयांनी केला वीज पुरवठा बंददरम्यान, ओएचई (ओव्हरहेड इक्वीपमेंट) वरील वीज पुरवठा तातडीने बंद केल्यामुळे अनर्थ टळला. यामुळे गाडी क्रमांक ५११९८ वर्धा पॅसेंजर, १२१४२ पटना सुपरफास्ट या गाड्या स्थानकावर थांबविण्यात आल्या. त्यांनाही काही वेळ उशिर झाला.