शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

निरोप मुलगा झाल्याचा, हाती दिली मुलगी

By admin | Updated: February 16, 2017 00:37 IST

जिल्हा रुग्णालय : मुलगा की मुलगीच्या संभ्रमाने नातेवाईक चिंतीत

जळगाव : जिल्हा रुग्णालयात महिलेची प्रसूती झाल्यानंतर मुलगा झाल्याचा निरोप नातेवाईकांना मिळाला मात्र प्रत्यक्ष हाती मुलगी देण्यात आल्याने नातेवाईक चिंतीत होऊन या विषयी बराच वेळ गोंधळ निर्माण झाल्याचा प्रकार बुधवारी जिल्हा रुग्णालयात घडला. अखेर मुलगीच झाल्याची खात्री पटल्याने चिंतेचे वातावरण निवळले. बुधवारी जिल्हा रुग्णालयात दोन महिलांच्या प्रसूती एकापाठोपाठ झाल्या. यात एका महिलेला मुलगा झाला तर दुसरीला मुलगी झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील कर्मचा:याने ज्यांना मुलगी झाली त्या नातेवाईकांना निरोप दिला तो मुलगा झाल्याचा. मात्र काही वेळाने प्रत्यक्ष बाळ ज्या वेळी हाती देण्यात आले त्या वेळी ती मुलगी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे नातेवाईक चिंतेत पडले व आपले बाळ बदल्याची त्यांना शंका आली. या बाबत त्यांनी तेथे विचारणा केली असता त्यांना सांगण्यात आले की, तुम्हाला मुलगीच झाली आहे. मात्र कर्मचा:याने मुलगा झाल्याचे सांगितल्याचे नातेवाईकांनी लक्षात आणून दिले. त्यावर या कर्मचा:याने ज्यांना मुलगा झाला त्याचे नातेवाईक असल्याचे समजून तुम्हाला सांगितले, असे स्पष्ट करण्यात आले. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात बाळ बदल झाल्याची जोरदार चर्चा होती.  मात्र प्रत्यक्षात बाळ बदलले नाही तर निरोप चुकीचा दिल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे  स्पष्ट झाले. नातेवाईकांचीही तक्रार नाहीया बाबत संबंधित नातेवाईकांशी चर्चा केली असता काही वेळ गैरसमज झाला होता. मात्र मुलगीच झाल्याची खात्री पटली असून बाळ बदलाचा कोणताच प्रकार नसल्याचे व कोणतीही तक्रार नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आईनेही ओळखलेनंतर प्रसूत महिलेनेही आपले बाळ ओळखून मुलगीच झाली असून ती आपल्याला दाखविण्यात आली होती, असे  सांगितले. पेढेही वाटपमुलगा झाल्याचा निरोप मिळाल्यानंतर संबंधित नातेवाईकांनी पेढेदेखील वाटप केले. मात्र मुलगा नसल्याचे त्यांच्या नंतर लक्षात आले.