अमळनेर : राजकारण करून स्वार्थासाठी ओबीसींमध्ये फूट पाडून सत्ता उपभोगणाऱ्यांना आता आपली ताकद दाखवणे केवळ गरजेचे नव्हे तर आवश्यक आहे. म्हणून एकत्र या, ताकद दाखवा व आरक्षणाचा न्याय मिळवा. आज राजकीय आरक्षण हिरावलं गेलं आहे. उद्या शैक्षणिक आरक्षणावर घाला घातला जाईल. त्याआधी आपल्यात क्रांतीची मशाल पेटवा, असे आवाहन लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी केले.
अमळनेर बाजार समितीत आयोजित केलेल्या ओबीसी आरक्षण परिषदेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, ज्येष्ठ नेते करीम सालार, बँकेचे संचालक संजय पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, एजाज मलिक, डॉ. सुरेश पाटील यांनी ओबीसींच्या जनजागृतीबाबत मनोगत व्यक्त केले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, रणजित शिंदे, संदीप घोरपडे, विनोद कदम, मनोज पाटील, रंजना देशमुख, सुरेश पीरन पाटील, मंदाकिनी पाटील, पन्नालाल मावळे, संभाजी पाटील, मुक्तार खाटीक, इमरान खाटीक, सईद तेली, रियाज मौलाना, अमित जनाब, नसीर हाजी, सुरेश पाटील, प्रताप माळी, अलीम मुजावर, सुनील शिंपी, गोविंदा बाविस्कर, श्रीनाथ पाटील, मयूर पाटील, अलका पवार, श्रावण तेले तसेच ओबीसी समाजातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेंद्र बोरसे यांनी ५,१०० रुपयांची मदत परिषदेला दिली.
प्रास्ताविक प्रा. अशोक पवार यांनी केले. सूत्रसंचालन अमोल माळी यांनी केले तर बन्सीलाल भागवत यांनी आभार मानले.