शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीतून धान्याच्या गोण्या लांबविणाऱ्याला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:16 IST

गुन्हा दाखल : दुचाकीवरील एक जण फरार; सुरक्षा रक्षकाची सतर्कता, झटापटीत पळाला साथीदार; घटना सीसीटीव्हीत कैद

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील दुकानांच्या बाहेर ठेवलेले गहू, दादर व बाजरीच्या गोण्या दुचाकीवरुन लांबविण्याऱ्या दोघांना सुरक्षा रक्षकांची रंगेहाथ पकडले. त्यात झटापटीत एक जण फरार झाला असून एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव विठ्ठल आत्माराम नेरकर (रा.दत्त नगर, रामेश्वर कॉलनी) असे आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आशिष शंकर अग्रवाल (३२, रा.आयोध्या नगर, जळगाव) यांचे दोन दुकान आहेत.गहू, दादर व बाजरी विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. रात्री दुकान बंद करुन जाताना धान्याच्या गोण्या काही बाहेरच ठेवलेल्या असतात. त्यांच्या दुकानाबाहेरुन सतत गोण्या चोरी होत असल्याने अग्रवाल यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन जण दुचाकीवरुन गोण्या चोरुन नेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अग्रवाल यांनी सुरक्षा रक्षक विजय पितांबर सोनवणे व समाधान रमेश सोनवणे यांना दुकानातून दोन दिवसापासून धान्याच्या गोण्या चोरी होत असल्याचे सांगून आज रात्री बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या.याप्रकरणी दोघांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार राजाराम पाटील करीत आहेत.दुचाकीवर ठेवल्या ९ गोण्या... गुरुवारी पहाटे साडे चार वाजता दुचाकीवरुन (क्र.एम.एच.१९ ए.बी.१७७७) दोन जण आले. त्यांनी ६० किलो वजनाच्या दादरच्या चार, ३० किलो वजनाच्या बाजरीच्या चार व ५० किलो वजनाची गव्हाची एक अशा १४ हजार ६६० रुपये किमतीच्या गोण्या दुचाकीवर ठेवून पलायन करणार तितक्यात सुरक्षा रक्षक विजय सोनवणे यांनी दोघांना पकडले. त्यावेळी जोरदार झटापटी झाली. त्यात एक जण पळून गेला. दरम्यान, त्याच वेळी गस्तीवर असलेले एमआयडीसीचे पोलीस स्टेशनचे तुकाराम निंबाळकर बाजार समितीकडून जात असल्याचे सुरक्षा रक्षकाला दिसले. त्याने त्यांना आवाज देऊन बोलावून घेतले. पकडण्यात आलेल्या संशयिताला त्याचे नाव विचारले असता त्याने विठ्ठल आत्माराम नेरकर असे सांगितले. दरम्यान, यावेळी सुरक्षा रक्षकाने मालक अग्रवाल यांनाही फोन करुन बोलावून घेतले.