शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

‘मनोबल’ची महाराष्ट्रभरातील अपंग अनाथ विद्यार्थ्यांना साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:20 IST

पॉझिटिव्ह स्टोरी जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनची सर्वांनाच झळ सहन करावी लागत असताना दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी हा ...

पॉझिटिव्ह स्टोरी

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनची सर्वांनाच झळ सहन करावी लागत असताना दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी हा काळ अधिकच आव्हानात्मक ठरत आहे. अशा वेळी या विद्यार्थ्यांना घरभाडे, किराणा साहित्य व इतर आवश्यक मदत मिळाल्यास ती दीपस्तंभच ठरते. याचा प्रत्यक्ष अनुभव राज्यभरातील विद्यार्थी जळगावातील मदतीमुळे घेत असून यातून त्यांचे एक प्रकारे मनोबलच वाढले आहे. कोरोनाच्या या संकटाच्या काळात दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ फाउंडेशन संस्था पुढे सरसावली असून या संस्थेने ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत’ या उपक्रमाअंतर्गत २१० अनाथ व २४० अपंग विद्यार्थ्यांना आधार दिला आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढला व सर्वच क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम झाला. याच कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग अजूनही हतबल आहे. भारतातही कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन लागू करण्यात आले असून या निर्बंधांचा काळ सर्वांसाठी अडचणीचा आहे. यात दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी तो अधिक जास्त आव्हानात्मक ठरत आहे. अशा परिस्थितीत दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ फाऊंडेशन पुढे आले आहे.

४५० विद्यार्थ्यांना आधार

दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबल प्रकल्पाअंतर्गत दिव्यांग, अनाथ विद्यार्थ्यांच्या निवासी निःशुल्क उच्चशिक्षण, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. त्यात आता कोरोनाचे संकट ओढावले असताना महाराष्ट्रभरातील आर्थिकदृष्ट्या असक्षम अपंग अनाथ, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना या लॉकडाऊनच्या काळात आणि नंतरही शिक्षण, आरोग्य व इतर कुठलीही अत्यावश्यक मदत दीपस्तंभ मनोबल मार्फत करण्यात येत आहे. ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत’ या उपक्रमाअंतर्गत २१० अनाथ व २४० अपंग विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट घरभाड्याची रक्कम जमा करण्यात आली असून काही जणांना किराणा साहित्यासाठी आर्थिक मदत तर काहींना थेट साहित्य देण्यात आले आहे.

स्वत: काम करीत उदरनिर्वाह करणारे अडचणीत

कोल्हापूर येथे असलेले ९४ गरजू अनाथ विद्यार्थी काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी अडचणीत आले. या विषयी कोल्हापूर मधील मनीषा शिंदे व पुणे येथील सनाथ संस्थेच्या गायत्री पाठक यांनी या विद्यार्थ्यांबाबत दीपस्तंभ फाऊंडेशनला कळविले. त्या वेळी त्यांना दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे तीन दिवसांपूर्वीच किराणा साहित्य व इतर मदत करण्यात आली. दीपस्तंभ परिवारातील सदस्य राजेश झोलदेव (दिल्ली), एरंडे, संदीप काटे (सातारा), डॉ. राजेश डाबी यांनी यासाठी योगदान दिले.

मदतीसाठी हात मोकळे

उपक्रमासंदर्भात अधिक माहिती संस्थेच्या वेबसाईटवर दिली आहे. लॉकडाऊनमध्ये अपंग अनाथ विद्यार्थ्याना कुठलेही अत्यावश्यक सहकार्य लागल्यास तसेच ज्या व्यक्तींना या उपक्रमात सहभागी होऊन अनाथ ,अपंग विद्यार्थ्यांना मदत करावयची असल्यास त्यांनी संस्थेशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो - लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या कोल्हापूर येथील अनाथ विद्यार्थ्यांना जळगावातील दीपस्तंभ मनोबल केंद्रातर्फे किराणा साहित्य देण्यात आले. या वेळी उपस्थित मनीषा शिंदे.