शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरासोबत पलायन केलेल्या भाचीला पाहून मामा ढसाढसा रडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

या घटनेबाबत माहिती अशी की, नागपूर येथील २० वर्षीय तरुण व २० वर्षीय तरुणी यांनी प्रेमप्रकरणातून २० मे २०१९ ...

या घटनेबाबत माहिती अशी की, नागपूर येथील २० वर्षीय तरुण व २० वर्षीय तरुणी यांनी प्रेमप्रकरणातून २० मे २०१९ रोजी घरातून पलायन केले. दोघांबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली. अधिकच्या चौकशीत दोघेही पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असून, अकरावीपासून एकाच ठिकाणी शिकवणीला असताना दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले. दोघंही वेगवेगळ्या समाजाचे असल्याने लग्नाला विरोध होऊ शकतो, या शक्यतेने घरातून पलायन केल्याचे उघड झाले. स्थानिक पोलिसांनी अनेक ठिकाणी चौकशी केली, मात्र त्यात त्यांना अपयश आले होते. तरुणीची आई व मामांनी तत्कालीन पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेतली, आईची अवस्था पाहता उपाध्याय यांनी पुन्हा यंत्रणा कामाला लावली; परंतु तेव्हाही अपयश आले. शेवटी या दोघांची माहिती देणाऱ्याला पाच हजारांचे बक्षीस दिले जाईल, असे पोलिसांना जाहीर करावे लागले. दीड वर्ष झाले तरी शोध लागत नसल्याने तरुणीच्या आईची प्रकृती खालावली. काही अनुचित घटना तर घडली नसावी ना, असा प्रश्न घोंगावत होता.

दर महिन्याला बदलवले घर

हे प्रेमीयुगुल तीन महिन्यापासून कालिंकामाता मंदिर परिसरात वास्तव्याला होते. त्याआधी ते हिंगाणा, ता. यावल येथे वास्तव्याला होते. दर महिन्याला घर बदल करीत असल्याने त्यांच्याविषयी रहिवाशांना शंका आली. त्यांच्यातील एका जणाने थेट स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती दिली. याची खातरजमा करण्यासाठी बकाले यांनी हवालदार शरद भालेराव व नरेंद्र वारुळे यांना पाठविले असता त्यात तथ्य आढळून आले. गोपनीय माहिती काढून त्यांच्याविषयी नागपूर पोलिसात काही गुन्हा दाखल आहे का? याची चौकशी केली असता हुळकेश्वर पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची नोंद असून, तिच्या शोधासाठी पोलिसांनी बक्षीस जाहीर केल्याची माहिती प्राप्त झाली. मुलगा, मुलगी जळगावात असल्याचे समजताच तेथील हवालदार नथ्थू ढोबळे, महिला कर्मचारी अनिता धुर्वे व मुलीचा मामा असे गुरुवारी रात्री जळगावकडे निघाले.

घर पाहून मामा हतबल..

या घटनेतील तरुणीचा मामा महावितरण कंपनीत वर्ग १चा अधिकारी आहे. शुक्रवारी सकाळी कालिंकामाता चौक परिसरात भाचीचे घर पाहून तो जागेवरच हतबल झाला. तरुणीच्या वडिलांचे निधन झालेले आहे, तिच्या आईची अवस्था पाहता मामा भाचीला पाहून ढसाढसा रडू लागला. स्थानिक पोलिसांनी दोघांना शनि पेठ पोलीस ठाण्यात नेले. तेथे नोंद करून त्यांचा ताबा घेतला. तेथून हे सर्व जण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बकाले यांच्याकडे आले. तुमच्यामुळे माझी भाजी सुखरूप मिळाली असे म्हणत मामाने हुंदके देत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दरम्यान, सकाळी ९ वाजता प्रेमीयुगुलाला घेऊन पोलीस नागपूरला रवाना झाले.