जळगाव : केंद्र सरकार विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जळगाव जिल्ह्यात लोकसंघर्ष मोर्चाने पाठिंबा दिला आहे. शेतकरी कायद्यांना विरोध करणारे निवेदन लोकसंघर्ष मोर्चाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दिले. यावेळी फारुक शेख, सचिन धांडे, मुकुंद सपकाळे, भरत कर्डिले, दिनेश अहिरे, सागर पाटील, राजेश पाटील, चंदन बिऱ्हाडे, अमोल कोल्हे आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्र सरकारने पारित केलेली तिन्ही कायदे मागे घ्या, शेतमालाला किमान हमीभाव देण्यासाठी कायदेशीर तरतूद करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या.