शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या अपहरण व खून प्रकरणी दोघांना जन्मठेप

By admin | Updated: May 30, 2017 17:55 IST

अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

ऑनलाईन लोकमत

अमळनेर,दि.30- 14 वर्षीय मुलाचे अपहरण करून, खंडणीसाठी त्याचा खून केल्याप्रकरणी  शेवगेतांडा (ता.पारोळा) येथील मोतीराम रोहीदास पवार व मोरसिंग सोनू पवार या दोघांना न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी दिला.
आरोपी मोतीराम पवार व मोरसिंग पवार यांनी रणछोडदास पवार याच्याकडून उस तोड कामागारांना पैसे देण्यासाठी दोन लाख रूपये घेतले होते. ते त्यांनी खर्च करून टाकले होते. म्हणून त्यांनी कट रचून 3 ऑक्टोबर 14 रोजी रणछोडदास पवार यांचा मुलगा अरूण पवार (14) याचे अपहरण केले होते. मुलाने आरडाओरड केल्याने, दोघांनी त्याचा गळा आवळून खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी पदम पवार यांच्या शेतातील नाल्याच्या कपारीत पुरून ठेवले. याप्रकरणी आरोपींना 5 ऑक्टोबर 2014 रोजी अटक करण्यात आली होती. पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा  दाखल झाला होता. हा खटला अमळनेर न्यायालयात चालला. सरकारी वकील अॅड. किशोर बागूल यांनी 11 साक्षीदार तपासले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना अपहरण प्रकरणी 10 वर्षे, कट रचल्याप्रकरणी 10 वर्षे, पुरावा नष्ट करण्याकामी 3 वर्षे, व खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.