शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पोलिसाला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 15:14 IST

दोघे जण वैद्यकिय रजेवर

जळगाव : लाचप्रकरणात अटकेतील संशयिताकडे संपत्तीची चौकशी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला जिल्हा विशेष शाखेचा कर्मचारी विजय उर्फ बाळासाहेब छगनराव जाधव याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे. कटारिया यांनी १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.मेहुणबारे, ता.चाळीसगाव येथील तत्कालिन मंडळाधिकारी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच प्रकरणात अटक केली होती. या काळात संपत्तीची चौकशी करु नये यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालिन निरीक्षक व सध्या नागपूर येथे सहायक निरीक्षक असलेले भिमा संभाजीराव नरके यांनी जिल्हा विशेष शाखेचे विजय जाधव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे श्यामकांत जगन्नाथ पाटील व अरुण विठ्ठल पाटील यांनी ५ ते १२ मे २०१७ या कालावधीत संशयिताकडे प्रत्यक्ष तसेच मोबाईलवर पाच लाखाची मागणी केली होती. तडजोडीअंती तीन लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते. खंडपीठाच्या आदेशाने शनिवारी मध्यरात्री चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाधिकारी तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी विजय जाधव याला पहाटे अटक केली. रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले. सरकारतर्फे अ‍ॅड.भारती खडसे यांनी बाजू मांडली.दोघे जण वैद्यकिय रजेवरया गुन्ह्यातील श्यामकांत जगन्नाथ पाटील व अरुण विठ्ठल पाटील हे दोन्ही कर्मचारी वैद्यकिय रजेवर असून त्यांची चौकशी केली जात आहेत. पुरावे हाती आल्यावर त्यांना अटक केली जाईल अशी माहिती तपासाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान,नरके हे नागपूर येथे कार्यरत आहेत.