शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या घटनांनी भुसावळ व मुक्ताईनगर हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST

भुसावळ / मुक्ताईनगर, जि.जळगाव : भुसावळ व मुक्ताईनगरात शुकवारची पहाट खुनाच्या घटनांनी उजाडली. भुसावळात दगडाने ठेचून ...

भुसावळ / मुक्ताईनगर, जि.जळगाव : भुसावळ व मुक्ताईनगरात शुकवारची पहाट खुनाच्या घटनांनी उजाडली. भुसावळात दगडाने ठेचून एका अज्ञात तरुणाचा खून करण्यात आला तर मुक्ताईनगरात मेहुण्यानेच शालकाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला.

मुक्ताईनगर येथे सासरी मुक्कामी आलेल्या मेहुण्याने २१ वर्षीय शालकाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून केला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता शहरातील पशुवैद्यकीय चिकित्सालय शेजारील इमारतीत उघडकीस आली.

तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विशाल वामन ठोसरे या तरुणासाठी गुरुवारची रात्र काळरात्र ठरली. गेल्या तीन दिवसांपासून सासरी मुक्कामी आलेला त्याचा मेहुणा विजय चैत्राम सावकारे (रा. चुंचाळे, ता. यावल) याने शालक विशाल झोपेत असताना डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृणपणे खून केल्याचा संशय आहे. घटनेनंतर संशयित मेहुणा फरार झाला.

गुरुवारी जावयासाठी पाहुणचार केल्यानंतर विशाल ठोसरे आणि मेहुणा विजय सावकारे हे घराच्या वरच्या मजल्यावर झोपायला गेले. रात्री दोघे एकाच खोलीत झोपले. मात्र सकाळी विशालचा मृतदेह आढळून आला तर मेहुणा येथून पसार झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचत पंचनामा केला. आरोपीच्या शोधासाठी जळगावहून श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. विशाल याचे वडील सेवानिवृत्त मुख्यध्यापक आहेत.

भुसावळात अज्ञात तरुणाचा

दगडाने ठेचून खून

भुसावळात जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. चेहऱ्याचा चेंदामेंदा झाल्याने या तरुणाची ओळख पटू शकली नाही.