शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

विविध धर्म-मतांचा खानदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 13:32 IST

जगभराच्या इतिहासाचे अवलोकन करू जाते.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 17 - खानदेशात जैन धर्माच्या प्रभावाच्या अनेक खुणा वाचता येतात. राजाच्या प्रभावामुळे वेळोवेळी जनतेवर त्या त्या धर्ममतांचा प्रभाव जगभर पडलेला दिसून येतो.  वाकाटक राजाने हिंदू धर्मासोबत बौद्ध धर्माला राजाश्रय दिल्यामुळे बौद्ध धर्माच्या प्रचार- प्रसाराची नांदीही येथे आढळते. जगभराच्या इतिहासाचे अवलोकन करू जाते. हे तथ्य ठळकपणे दृष्टोत्पत्तीस येते की, सर्वत्र राजसत्तेने जनतेवर धर्माची जबरदस्ती केली आहे. राजसत्तांचे पतन झाल्यावर त्या विशिष्ट धर्ममतांची पिछेहाट जगाने अनुभवली आहे.खानदेशात नाशिकजवळ चंदनपूर येथे जैन धर्माचा मठ होता. येथील अमोघ जैन मठासाठी राष्ट्रकूट राजे उपस्थित राहात असत. जैन धर्मीय श्वेतांबर पंथाचा प्रभाव कळवणच्या परिसरात होता. कळवणनजीकचे कालकालेश्वर हे जैन तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याचे अकराव्या शतकातील ताम्रपटातील तपशील सांगतो. येथील देवालयातील काही धार्मिक विधी करण्यासाठी जैन भिक्षुला तत्कालीन भोजदेव राजाने भूमी दान केल्याची नोंद आहे. मांगीतुंगीचे जैन क्षेत्र या गोष्टीचा पाठपुरावा करते. बळसाणा येथील जैन तीर्थाचे प्राचीनत्त्व इतिहाससिद्धच आहे. यादववंशीय सेऊणदेव राजानेही त्रिंबकजवळील अंजनेर येथील आठवे र्तीथकर चंद्रप्रभू यांच्या मंदिर व पूजा व्यवस्थेसाठी भूमी आणि वास्तू दान केल्याचे उल्लेख आढळतात. प्राचीन खानदेशात बौद्ध प्रमाणेच जैन धर्माचाही प्रसार झाला होता. जैन धर्मगुरू अम्मादेव यांच्या शिकवणुकीमुळे खानदेशातील अनेक हिंदूंनी जैन धर्म स्वीकारल्याचा उल्लेख आढळतो.आठव्या आणि नवव्या शतकात राष्ट्रकूट राजांच्या राजवटीत खानदेशात जैन व वैदिक धर्माना  राजाश्रय मिळाला होता. राजा इंद्र तिसरा हा जैन धर्मोपासक असल्यामुळे याने जैन मठ आणि मंदिरांसाठी खानदेशातील काही गावे दानात दिल्याचा पुरावा हाताशी लागतो.खानदेशातील सातव्या शतकातील निकुंभ राजे वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. अल्लशक्ती या राजाने पिंपळनेर जवळची काही भूमी दान केल्याचा उल्लेख कासारे येथे सापडलेल्या ताम्रपटात आहे. स्थलीनगर अर्थात थाळनेर भागातील काही जमीन कुंभकर्णवंशीय भानुषेण राजाने नागवसू नामक यजुव्रेदिय ज्ञानसाधकाला दिल्याचा पुरावा मिळतो. माता आणि देवता यावर समान विश्वास बाळगण्यावर या काळात भर दिसतो. भानुषेण राजाने अमळनेरजवळ बोरी नदीच्या काठावरील टाकरखेड येथील काही भूमी दान केल्याचा उल्लेख आहे. बळसाणे येथील मंदिरातल्या शिलालेखाच्या आधारे असे म्हणता येते की, निकुंभवंशीय राजा कृष्णा याने विद्वानांचा आदर केला होता. बहलापुरी बहाळ आणि देवगाव या आताच्या जळगाव जिल्ह्यातील गावांचे दान तत्कालीन वेदज्ञ नागशर्मनला केल्याचा पुरावा ताम्रपटातून मिळतो.सातपुडय़ाच्या प्रवेशद्वाराशीच नागाजरुनाची मूर्ती आहे, अतिशय सुबक अशी ही मूर्ती आहे. धडगाव मोलगी मार्गावर एक अतिशय सुंदर शिल्प आहे. बुधकौशिक ऋषी कृत श्री रामरक्षा स्तोत्रात वर्णिलेल्या ‘वामांकारुढा सीता’ अशा सीतारामाची मूर्ती इथे आहे. ही पितळी व नयनरम्य मूर्ती अजूनही संशोधकांची वाट बघत आहे. सातपुडय़ात दिवाळीच्या दरम्यान अश्वत्थाम्याची मोठी साहसपूर्ण यात्रा सुरू असते. अजूनही आपल्या जखमांसाठी तेल- चिंध्यांचे दान मागत हिंडणारा चिरंजीवी अश्वत्थामा लोकमानसात दृढ आहे. तो शाप भोगत या परिसरात-सातपुडय़ाच्या द:या खो:यांमधून भटकतोय, असे मानले जाते. पंधराव्या शतकात पिरानापंथ किंवा इमादशाहीज पंथाची स्थापना झाली. यालाच सतपंथ म्हणून ओळखले जाते. संत सैयद महम्मदशाह या शाखेचे संस्थापक होते. बहादरपूर आणि ब:हाणपूर ही या संप्रदायाची पवित्र स्थळे होत. गुजरातप्रमाणेच खानदेशातही या पंथाला अनेक हिंदू- मुस्लिम अनुयायांची साथ लाभली. हा पंथ हिंदू-मुसलमानांमध्ये सारखाच मान्यताप्राप्त होता. शहादा तालुक्यातील पाडळदा येथील मुरली मनोहराची अष्टभुजा मूर्ती शिल्प आणि सौंदर्याच्या दृष्टीने अतिशय मनोहर अशी आहे. खांडरागड नावाचे एक अतिप्राचीन स्थळ चोपडय़ाच्या (चंपानगरी) जवळ दर्शवले जाते. अशीरगड येथे द्रोणपुत्र अश्वत्थामाचे मंदिर आहे. खानदेशच्या या वैभवशाली परंपरेत संतांची मांदियाळी फुलली आहे. या संत-भक्तांनी आपापल्या ज्ञानसाधनेने भगवंताची आराधना केली. र्सवकष मानवी हिताचा विचार मांडला आहे. - प्रा.डॉ. विश्वास पाटील