शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘दिऊ’ला तुमच्याकडे ठेव... प्लीज कुणाचं जवळ नको देऊ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:16 IST

जळगाव : ‘दिऊ’ला तुमच्याकडे ठेव...प्लीज कुणाचं जवळ नको देऊ...असा संदेश भावाला पाठवून विवाहित बहिणीने राहत्या घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने ...

जळगाव : ‘दिऊ’ला तुमच्याकडे ठेव...प्लीज कुणाचं जवळ नको देऊ...असा संदेश भावाला पाठवून विवाहित बहिणीने राहत्या घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास बांभोरी येथे घडली. कविता राकेश सोनवणे (२२, रा. दत्तनगर वाल्मीक नगर, बांभोरी, ता. धरणगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही.

नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार पिंप्राळ्यातील कविता यांचे दोन वर्षांपूर्वी बांभोरी येथील राकेश सोनवणे यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक वर्षाची दुर्वा ही मुलगी आहे. दरम्यान, रविवारी घरात कुणीही नसताना दीड ते दोन वाजेच्या सुमारास कविता यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर कुटुंबीय घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तर सासरच्यांनी कविता यांच्या माहेरच्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर तिचे वडील गंगाधर महाजन व मुलगा सुशील यांनी नातेवाइकांसह जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. त्यामुळे रुग्णालयात एकच गर्दी झाली होती.

आईकडे मुलगी ठेवून रविवारी सासरी परतली

मयत कविता ही शनिवारी माहेरी आली होती. ती एक ते दोन दिवस थांबणार असल्याचे त्यांनी आई-वडिलांना सांगितले. मात्र, रविवारी मुलगी दुर्वा हिला आईकडे ठेवून ती सकाळी सासरी आली. त्यानंतर दुपारी आत्महत्येची माहिती मिळाली. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही.

भावाच्या व्हॉट्सअ‍ॅपला पाठविला संदेश

दरम्यान, कविता यांनी आत्महत्या करण्यापूर्वी भाऊ सुशील याला व्हॉट‌्सअ‍ॅपवर संदेश पाठविले. त्यात ‘दिऊ’ला तुमच्याकडे ठेव...प्लीज कुणाचं जवळ नको देऊ...असा संदेश पाठविला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. रविवारी सायंकाळी पोलिसांनी पंचनामा केला. मुलीबाबत घातपात झाला असेल तर त्याची चौकशी व्हावी, अशी विनंती मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना केली.