शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

फक्त एकच जागा, दिग्गज मैदानात

By admin | Updated: January 5, 2016 01:19 IST

जामनेर : शहरातील नगरपालिकेची सत्ता गमावल्या नंतर काँग्रेस आघाडीला आता एका जागेसाठी होणा:या पोटनिवडणुकीसाठी चांगलाच जोर चढल्याचे दिसते.

जामनेर : शहरातील नगरपालिकेची सत्ता गमावल्या नंतर काँग्रेस आघाडीला आता एका जागेसाठी होणा:या पोटनिवडणुकीसाठी चांगलाच जोर चढल्याचे दिसते. प्रभाग क्रमांक एकमधील फक्त एका जागेची पोटनिवडणूक येत्या 10 जानेवारी रोजी होऊ घातली आहे. त्यासाठी चक्क काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संजय गरुड आणि माजी नगराध्यक्ष आदी दिग्गज प्रचार रॅलीत सामील झाले.

सोमवारी काँग्रेस आघाडीकडून जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली़ राष्ट्रवादीचे प्रा. शरद पाटील, शंकर राजपूत, भगतसिंग पाटील, बंटी भैया, प्रा. उत्तम पवार, अजय पाटील, रघुनाथ धनगर, जगन लोखंडे, दीपक मिस्तरी, पिंटू चिप्पड, नामदेव पालवे आदी यात सहभागी झाले होत़े

प्रभाग क्रमांक एकमधील एका जागेवर भाजपाच्या सुनीता संजय नेमाडे तर काँग्रेस आघाडीच्या लीलाबाई संतोष बोरसे यांच्यात समोरासमोर लढत होणार आहे. नगरपालिकेच्या इतिहासातील पहिलीच पोट निवडणूक असल्याने या होणा:या निवडणुकीविषयी मतदारांनाही मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येते. अडीच वर्षापूर्वी या प्रभागातून काँग्रेस आघाडीचे चारही उमेदवार विजयी झाले होते.

त्यातून काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष शंकर बेनाडे (राजपूत) यांच्या पत्नी मथुराबाई बेनाडे (राजपूत) यांच्या जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरविण्यात आले होते. त्या रिक्त जागेवर ही निवडणूक होते आहे.

प्रतिष्ठा लागणार पणाला

अडीच वर्षापूर्वी भाजपाच्या कब्जातून काँग्रेस आघाडीने सत्ता हिसकावून घेतली होती, पण आपसातील सुंदोपसुंदीमुळे अडीच वर्षातच सत्ता गमाविण्याची पाळी त्यांचेवर आली़ आणि भाजपाच्या साधना महाजन नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या. भाजपाच्या हाताता सत्ता असली तरी कागदोपत्री बहुमत काँग्रेस आघाडीचेच दिसते. यामुळे एका जागेच्या निवडणुकीसाठी भाजपा आणि आघाडी यांची चांगलीच प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याचे दिसते. येत्या 10 जानेवारी रोजी मतदान तर 11 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होतो, याकडे सर्वाचे लक्ष लागून आह़े

(वार्ताहर)