शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जळगावकरांवर पावसाचा रुसवा कायम

By विलास.बारी | Updated: August 29, 2017 18:03 IST

जिल्ह्यात तीन महिन्यांनंतरही केवळ 56 टक्के पाऊस. नाशिकमधील पजर्न्यवृष्टीमुळे गिरणा धरणात 55.64 टक्के जलसंचय

ठळक मुद्देमध्यम प्रकल्पात समाधानकारक जलसाठा तर लघुप्रकल्पात ठणठणाटगेल्या वर्षाच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात 10 टक्के पाऊस कमीहवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर बळीराजाच्या आशा पल्लवित.विहिरींमधील जलसाठा वाढीसाठी अजूनही जोरदार पावसाची आवश्यकता

विलास बारी / ऑनलाईन लोकमतजळगाव, दि.29 - हवामान विभागाने पाच दिवस अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने कहर केला असताना  तीन महिने उलटल्यानंतरही जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 56 टक्के पाऊस झाल्याने जळगावकरांवर पावसाचा रुसवा कायम आहे. जिल्ह्यातील 8 लघु प्रकल्पांमध्ये अजूनही 50 टक्क्यांच्या आत जलसाठा आहे.हवामान विभागाने सर्वत पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सोमवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर आणि रावेर या तीन तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. तर अन्य ठिकाणी तुरळक पाऊस झाला.

तीन महिन्यात सरासरीच्या 56 टक्के पाऊसजळगाव जिल्ह्यात पावसाळ्यात वार्षिक सरासरी पजर्न्यमान हे 663.3 टक्के होत असतो. मात्र तीन महिन्यांचा कालावधी झाला असताना आतार्पयत केवळ  370.7 मिमी पाऊस झालेला आहे. सरासरीच्या केवळ 56 टक्के पाऊस आतार्पयत झालेला आहे. यात सर्वाधिक 70.7 मिमी पाऊस हा पारोळा तालुक्यात तर सर्वात कमी 37 मिमी पाऊस हा अमळनेर तालुक्यात झालेला आहे.

नाशिकमधील पजर्न्यवृष्टीचा गिरणेला लाभकाही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने त्याचा लाभ गिरणा धरणाला होत आहे. त्यामुळे 29 ऑगस्टर्पयत या धरणात 55.64 टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट अखेर या धरणात 67.30 टक्के जलसाठा होता. यावर्षी वाघूर धरणात 64.47 टक्के तर हतनूर धरणात 66.12 टक्के जलसाठा आहे.8 लघुप्रकल्पांमध्ये ठणठणाटपावसाळ्याचे तीन महिने उलटल्यानंतरही जळगाव जिल्ह्यातील 8 लघुप्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. त्यात अग्नावती, हिवरा, बहुळा, भोकरबारी, बोरी व मन्याड या प्रकल्पांमध्ये अजूनही शून्य टक्के जलसाठा आहे. तर अंजनी 3.62 टक्के, गुळ धरण 35.26 टक्के, मोर धरणात 49.17 टक्के जलसाठा आहे. अभोरा, सुकी, तोंडापूर धरणात 50 टक्क्यांच्या वर जलसाठा आहे. तर मंगरुळ हा एकमेव लघुप्रकल्प 100 टक्के भरलेला आहे.

10 टक्के पाऊस घटलागेल्यावर्षी 29 ऑगस्टर्पयत जिल्हाभरात 67.5 टक्के पाऊस झाला होता. या कालावधीत सरासरीच्या 446.9 मिमी पाऊस झालेला होता. मात्र यावर्षी त्यात तब्बल 10 टक्के घट झाली आहे. यावर्षी सरासरीच्या 370.7 मिमी पाऊस झाला असून केवळ 56 टक्के पाऊस झाला आहे. काही ठराविक अंतराने पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अजूनही विहिरींमध्ये पुरेसा जलसाठा झालेला नाही. मध्यम व लघुप्रकल्पांत पाणी नसल्याने अनेक गावांमध्ये भर पावसाळ्यात पाणी टंचाई जाणवत आहे.