शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव पोलीस दल झाले हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 04:01 IST

डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या धोरणाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जळगाव जिल्हा पोलीस दलाने जनतेशी निगडित ९ सेवा आॅनलाइन केल्या आहेत

सुनील पाटील जळगाव : डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या धोरणाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून जळगाव जिल्हा पोलीस दलाने जनतेशी निगडित ९ सेवा आॅनलाइन केल्या आहेत. सेवा हमी कायद्यांतर्गत नागरिकांसाठी या सेवा आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. या सेवांमुळे नागरिकांना पोलीस ठाण्यात जाण्याची आवश्यकता भासत नाही. तंत्रज्ञानात पोलीस दलानेही एक पाऊल पुढे टाकले आहे.आपत्कालीन, गुन्ह्यांच्या, तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी पीडित नागरिक व महिलांना तत्काळ पोलिसांची मदत मिळावी, यासाठी प्रतिसाद अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. टोल फ्री क्रमांक, याशिवाय वाहनचोरीची तक्रार करण्यासाठी वाहन चोरी डॉट कॉम हे पोर्टल २७ मे २०१६ पासून सुरू करण्यात आले आहे. फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप, सीसीटीव्ही मोबाइल व्हॅन, आॅनलाइन चरित्र पडताळणी आदी अ‍ॅप व यंत्रणा आॅनलाइन करण्यात आलेल्या आहेत.प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन टॅबतंत्रज्ञानात आणखी पुढचे पाऊल म्हणून पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दोन स्वतंत्र टॅब देण्याचा निर्णय घेतला. एक टॅब हा गुन्ह्यांच्या माहितीसाठी असणार आहे, तर दुसरा टॅब हा पासपोर्टसाठी असणार आहे. घटनास्थळावर फोटो काढणे, व्हिडीओ चित्रण करणे, पुरावे घेणे आदी कामे केली जाणार आहेत. या कामासाठी स्वतंत्र टॅब देणारा जळगाव हा महाराष्टÑातील पहिला जिल्हा आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी स्वत:हून त्यासाठी पुढाकार घेत हा विषय मार्गी लावला.सायबर प्रकल्पाची निर्मितीनवीन तंत्रज्ञान व उपकरणे वापरुन गुन्हे करण्याचे प्रमाण व त्याच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या साऱ्या घटनांना वेळेत नियंत्रण आणण्याकरिता गृह विभागाने सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पांतर्गत जिल्हा स्तरावर सायबर लॅब, महाराष्टÑ सीईआरटी, सिक्युरिटी आॅपरेशन सेंटर व ट्रेनिंग सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्टÑात ४७ ठिकाणी सायबर लॅब होत्या, त्याचे रूपांतर सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे. महाराष्टÑात बहुतांश ठिकाणी पोलीस ठाण्यात रूपांतर झालेले नाही, जळगावात मात्र हे पोलीस ठाणे सुरू झाले.