शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जळगाव -पाचोरा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित

By admin | Updated: March 31, 2017 10:55 IST

केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 3 जानेवारी 2017 रोजीच राजपत्राद्वारे जळगाव-शिरसोली-पाचोरा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केलेला असताना जळगाव महापालिका मात्र अनभिज्ञ आहे.

 जळगाव,दि 31 - केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 3 जानेवारी 2017 रोजीच राजपत्राद्वारे जळगाव-शिरसोली-पाचोरा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केलेला असताना त्याबाबत अनभिज्ञ असलेल्या राज्य शासनाने नगरविकास राज्यमंत्र्यांकडे झालेल्या सुनावणीच्या अनुषंगाने या रस्त्याचे अवर्गीकरण करण्याचे आदेश मनपाला 12 जानेवारी रोजी दिल्याचे अॅड.विजय भास्करराव पाटील यांनी आयुक्तांकडे नोंदविलेल्या हरकतीवरून उघड झाले आहे. अॅड.पाटील यांनी 12 जानेवारीच्या शासन आदेशास व मनपाने त्यानुसार अवर्गीकरण करण्याचा प्रस्ताव पाठविण्यास कायदेशिर हरकत घेतली आहे. 

जळगाव शहर मनपा हद्दीतून जाणा:या जळगाव-शिरसोली- पाचोरा या राज्य मार्गालगत मौजे मेहरूण स.नं.413, प्लॉट नं.161 वरील बांधकामाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून गाजत आहे.  स.नं.413 मधील श्री डेव्हलपर्स यांच्या मालकीच्या जागेवर मनपाने 26 जुलै 2012 रोजी 1 एफएसआयच्या अनुषंगाने बांधकाम परवानगी दिलेली होती. ही परवानगी देताना मनपाने सार्वजनिक बांधकाम विभागाचा इमारत रेषा (बिल्डींग लाईन) /नियंत्रण रेषा याबाबतचा अभिप्राय घेतला नव्हता. तसेच या अनुषंगाने शासन निर्णय 9 मार्च 2001 नुसार नियमांचे पालन केलेले नव्हते. श्री डेव्हलपर्स यांनी या जागेवरील दोन मजले बांधकामासाठी सुधारित बांधकाम परवानगी मनपाकडे 11 नोव्हेंबर 2014 रोजी दाखल केल्यानंतर मनपाने त्यांना 16 जानेवारी 2015 च्या पत्रान्वये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम रेषेचेच्या अनुषंगाने ना-हरकत प्रमाणपत्र सादर करण्याबाबत कळविले होते. मनपा आयुक्तांनी 4 सप्टेंबर 2015 रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्र पाठवून राज्य मार्ग लक्षात घेऊन किती अंतरावर बांधकाम/नियंत्रण रेषा असणे आवश्यक आहे? अशी विचारणा केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाने मनपाला 15 सप्टेंबर 2015 च्या पत्रान्वये उत्तर दिले आहे. त्यानुसार बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार मनपाला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ना-हरकत देण्याचा विषय येत नाही. मात्र तरीही शासन निर्णयानुसार रस्त्याच्या हद्दी शेजारून 12 मीटर सेवा रस्ता, तसेच 3 ते 6 मीटर सेट बॅक एवढय़ा अंतरावर बांधकाम रेषा असावी, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे या तीन मजली इमारतीवर हातोडा पडणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र याप्रकरणी श्री डेव्हलपर्स यांनी शासनाकडे अपिल केले होते. नगरविकास राज्यमंत्र्यांकडे यावर सुनावणी झाली. त्यानुसार राज्य शासनाने 12 जानेवारी 2017 रोजी मनपाला पत्र पाठवून मनपा हद्दीतील या रस्त्याचे अवर्गीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करून महिनाभरात पाठविण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत.